Powered by Blogger.

Sunday, 23 April 2017

व्हॉट्सअॅप ग्रुप अॅडमिन व्हा सावधान

No comments :

प्रतिनिधी = ज्ञानराज पाटील

व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून अनेक फोटोज, व्हिडिओज किंवा एखादी माहिती एका क्षणात शेकडो लोकांपर्यंत पोहोचते.व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून अनेकदा चुकीची माहिती, छेडछाड केलेले फोटो किंवा आक्षेपार्ह व्हिडिओज शेअर करण्यात येतात. आता व्हॉट्सअॅप सारख्या सोशल मीडियाच्या माध्यमातून चुकीची किंवा खोटी माहिती पसरवणं तुम्हाला महागात पडू शकतं.ग्रुपमध्ये कधीकधी असे मेसेजेस येतात की त्याच्या सत्यतेसंदर्भात शंका असते. मात्र, कुणीही यासंदर्भात क्रॉसचेक न करता थेट मेसेजेस फॉरवर्ड करण्यास सुरुवात करतात. पोलिसांनी सोशल मीडिया आणि व्हॉट्सअॅप ग्रुपच्या माध्यमातून चुकीच्या बातम्या, अफवा पसरविणा-यांविरोधात कडक कारवाई करण्यास सुरुवात केली आहे.
      मध्यंतरी गुप ऍडमिनला अश्या सायबर गुन्ह्यातून वगळले आहे अशी चर्चा होती पण आता व्हॉट्सअॅप ग्रुप चालविणा-या अॅडमिनने सावधान व्हावे. जर त्यांच्या ग्रुपमध्ये चुकीची माहिती, अफवा पसरविणारी पोस्ट मिळाल्यास संबंधित व्यक्तीसोबतच ग्रुप अॅडमिन विरोधात एफआयआर दाखल करण्यात येणार आहे.

No comments :

Post a Comment