Powered by Blogger.

Saturday, 22 April 2017

आंबे लवकर पिकण्यासाठी सर्रासपणे घातक रसायनाचा वापर 

No comments :

प्रतिनिधी ज्ञानराज पाटील

आंबे लवकर पिकावेत यासाठी विक्रेते, व्यापारासाठी सर्रासपणे घातक रसायनाचा वापर करतात. त्यामुळे आंबे खरेदी करताना ग्राहकांनी दक्ष राहावं .
      तुम्ही खात असलेला आंबा कसा पिकवला आहे याची खातरजमा करून घ्या. कारण घातक रसायनांपासून पिकवलेले तब्बल 890 किलो आंबे उल्हासनगरमध्ये जप्त करण्यात आले आहेत.
         लोकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या अनेक आंबेविक्रेत्यांकडून राज्याच्या कानाकोपऱ्यात कार्बाईड नावाच्या विषारी रसायनाचा वापर करुन कृत्रिमरित्या पिकवलेले आंबे बाजारपेठेत आणल्याचे विविध ठिकाणी अन्न व औषध प्रशासनाने छापे टाकून उघडकीस आणले असले तरीही हे विषारी आंबे राज्यात विक्रीस येत आहेत. अशा विषारी आंब्यातून प्रोटिन मिळण्याऐवजी शरीरात विष पेरले जात असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.

        नैसर्गिकरित्या आंबे पिकवण्याची पध्दत वेळखाऊ असल्याने आंबे व्यापाऱ्यांकडून बहुतेक पिकवणगृहात कॅल्शियम कार्बाईडचा मोठ्या प्रमाणात वापर केला जात आहे. 
हे रसायन आरोग्यासाठी अतिशय घातक आहे. तरीही कमी वेळात आंबे विक्रीस आणून अधिक पैसा मिळवण्यासाठी नागरिकांच्या आरोग्याचा विचारही काही व्यापाऱ्यांकडून होत नाही. 

No comments :

Post a Comment