Friday, 21 April 2017
मौजे वडगांव सरपंच पदी सतीश चौगुले
हेरले / प्रतिनिधी (लक्ष्मण कांबरे)
मौजे वडगांव ( ता. हातकणंगले) ग्राम पंचायतीच्या सरपंच पदी जय शिवराय ग्राम विकास आघाडीचे सतीश चौगुले यांची बिनविरोध निवड झाली
आघाडीत ठरले प्रमाणे सरपंच यासीन मुलाणी यानी राजीनामा दिल्याने गेले महिनाभर सरपंच पद रिक्त होते. सरपंच पदासाठी सतीश चौगुले यांचा एकच उमेदवारी अर्ज आलेने निवड बिनविरोध झाली.सुचक यासीन मुलाणी व संजय सावंत होते. निवडीनंतर नुतन सरपंच यानी सर्वांना बरोबर घेऊन काम करणार व उर्वरीत काळात चांगले योगदान देऊं असे मत मांडले
निवडणूक अधिकारी म्हणून
हेरले मंडल अधिकारी वी .जी. कोळी तसेच ग्रामविकास अधिकारी ए .पी. द्रविड यांनी काम पाहिले . यावेळी उपसरपंच शिल्पा थोरवत ग्रा.प. सदस्या संगीता कांबरे, सारिका चौगुले, सुरेखा नलवडे ग्रा .पं. सदस्य संजय सावंत, अविनाश कांबळे, आघाडीचे पॅनेल प्रमुख रावसो चौगुले मार्गदर्शक,श्रीकांत सावंत, माजी विशेष कार्यकारी अधिकारी प्रकाश कांबरे, सचिन लोहार ,माजी उपसरपंच सुरेश कांबरे, चेअरमन महादेव शिंदे, पोलीस पाटील अमिर हजारी भाजपाचे आनंदा थोरवत, माजी ग्रा.पं. सदस्य धोंडीराम चौगुले, चेअरमन विजय चौगुले, व्हा . चेअरमन कृष्णात गोरड, गटनेते आनंदा पोवार, संचालक मंदार मुसळे, माजी ग्रां .प. सदस्य सुनिल सुतार, युवानेते सतीश वाकरेकर, अवि पाटील, महादेव चौगुले, अमोल झांबरे, युवासेना विभागप्रमुख अनंत जाधव, माजी चेअरमन बाळासो थोरवत , माजी चेअरमन प्रकाश चौगुले, भाजपा शाखाप्रमुख प्रदिप लोहार, चेअरमन विठ्ठल सावंत, कोतवाल महंमद जमादार व भारत पाटील उपस्थित होते. प्रास्तविक ग्रामसेवक ए .पी. द्रविड यांनी केले तर आभार कॉ .प्रकाश कांबरे यांनी मांडले .
फोटो -
मौजे वडगांव ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी सतिश चौगुले यांची निवड झाले नंतर आघाडीच्या वतीने शुभेच्छा स्विकारतांना शेजारी ग्रा.प.सदस्य व आघाडी प्रमुख व इतर मान्यवर.
No comments :
Post a Comment