Powered by Blogger.

Thursday, 20 April 2017

लाल दिवा गेला; ‘व्हीआयपी ट्रीटमेंट’ कधी बंद होणार ?

No comments :
प्रतिनिधी - ज्ञानराज पाटील
मोदी सरकारच्या आदेशानंतर वाहनांवरील लाल दिवे उतरवले आहेत. पण मोदींना सत्तेवर आल्यावर लाल दिवा बंद करायला इतका वेळ का लागला?
पंजाबमध्ये अमरिंदर व यूपीत योगींनी लाल दिवा बंद केल्यावर केंद्राला जाग आली.
ठीक आहे देर आये दुरुस्त आये,
लाल दिवा व्हिआयपी संस्कृतीचे प्रतिबिंब असल्याने मोदी सरकारने लाल दिवा उतरवण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र लाल दिव्याव्यतिरिक्त केंद्रासह राज्यातील मंत्र्यातील अनेक ठिकाणी स्पेशल ट्रिटमेंट मिळते. मंत्र्यांना मिळणाऱ्या व्हिआयपी ट्रिटमेंटची यादी खूप मोठी आहे आणि ती जर बंद करण्यात सरकारला यश मिळाले तरच लाल दिवा बंदी सार्थ झाली असे म्हणता येईल.
   व्हीआयपी लोकप्रतिनिधींना अनेक घरगुती खर्चदेखील दिले जातात. उदा. , लाँड्रीचे बिलदेखील लोकप्रतिनिधींना दिले जाते.सरकारी विश्राम गृहात मोफत निवास. व्हीआयपीना साधारणत: 15 ते 20 पोलिसांकडून सुरक्षा पुरवली जाते. व्हीआयपीची विमानतळावर तपासणी केली जात नाही. व्हीआयपीला पाणी आणि विज, फोन रेल्वे बस मोफत असतात.
व्हीआयपींना सरकारी घरांमध्ये फुकट राहायला मिळते. या घरातील फर्निचरपासूनचा ते नोकर चाकर सगळा खर्च  जनतेच्या पैशांतून केलेला असतो.
    
          तेव्हा मोदीजी नुसता लाल दिवा काढून चालणार नाही तर ही व्हीआयपी संस्कृती बंद करून दाखवा आणि हे फक्त तुम्हालाच शक्य आहे. 

No comments :

Post a Comment