Saturday, 1 April 2017
महाआरोग्य शिबिराचा मुरगुड व परिसरातील 900 रुग्णांनi लाभ
मुरगुड प्रतिनिधी - समीर कटके
कै सौ विजयमाला सदाशिवराव मंडलिक यांच्या 35 व्या स्मृतिदिनानिमित्त मुरगुड नगरपरिषदेच्या वतीने
आयोजित केलेल्या महाआरोग्य शिबिराचा मुरगुड व परिसरातील 900 रुग्णांनी लाभ घेतला.उदघाटन
समारंभाच्या अध्यक्षस्थानी शिवसेनेचे संपर्क प्रमुख प्रा.संजय मंडलिक होते.
अध्यक्षीय भाषणात बोलताना प्रा. मंडलिक म्हणाले समाजातील वंचित घटकांना आरोग्य सेवेचा लाभ
व्हावा या उद्देशाने महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. मुरगूड नगरपालिकेचा हा
स्तुत्य उपक्रम असल्याचे त्यांनी सांगितले.
निवृत्त सह.शिक्षण संचालक संपतराव गायकवाड यांच्या हस्ते शिबिराचे उदघाटन झाले. संपतराव
गायकवाड, डॉ.जयप्रकाश रामानंद,डॉ.अमोल पाटील यांची भाषणे झाली. या शिबिरात पंचक्रोशीतील
तब्बल ८९५ रुग्णांनी सहभाग नोंदवला. या शिबिरात कॅन्सर, ह्रदयरोग, पोटविकार, स्त्रियांचे आजार,
लहान मुलांचे आजार, त्वचा विकार, नेत्र तपासणी, अस्थिरोग (हाडांचे आजार), कान, नाक, घसा विकार
आदी रोगांवर जिल्हयातील नामवंत रुग्णालयातील तज्ज्ञ डॉक्टरांनी रुग्णांची मोफत तपासणी केली.
उपनगराध्यक्ष जयसिंग भोसले यांनी स्वागत, नगराध्यक्ष राजेखान जमादार यांनी प्रास्ताविक, अविनाश
चौगले यांनी सूत्रसंचालन केले. नामदेवराव मेंडके यांनी आभार मानले. या वेळी जिल्हा शल्यचिकित्सक
डॉ. एल. एस. पाटील, डॉ. जयप्रकाश रामानंद, वैशाली मंडलिक, पं. स. सभापती कमल पाटील, वीरेंद्र
मंडलिक, प्रकाश पाटील, विश्वास कुऱ्हाडे, जि. प.सदस्या शिवानी भोसले, पं.स.सदस्य विजय भोसले,
मनीषा सावंत, पूनम महाडिक, वैद्यकीय अधीक्षक डॉ. पी. वाय. तारळकर आदी मान्यवर उपस्थित
होते.
Subscribe to:
Post Comments
(
Atom
)
No comments :
Post a Comment