Powered by Blogger.

Saturday, 1 April 2017

आरोग्य भारतीच्यावतीने 'पुरोहितांचे आरोग्य' या विषयावर व्याख्यान

No comments :

      प्रतिनिधी सर्जेराव पोवार

     कोल्हापूर - आयुष्यभर औषधे खाऊन सर्व रिपोर्टस नॉर्मल ठेवणे म्हणजे निरोगी आरोग्य हि खोटी समजूत समाजात निर्माण झाली असून निरोगी आयुष्याला पथ्य आणि आयुर्वेद याशिवाय पर्याय नसल्याचे प्रतिपादन वैद्य सुविनय दामले यांनी येथे बोलताना केले.

आरोग्य भारती ' कोल्हापूरच्या वतीने पौरोहित्य करणाऱ्या सर्व पुरोहित बांधवांकरिता वैद्य दामले यांचे मंगलधाम येथे 'पुरोहितांचे आरोग्य' या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते,  नगरसेवक अजित ठाणेकर, पुरोहित संघाचे अध्यक्ष सतीश नीरगुडकर यांच्या उपास्थितीत झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आरोग्यभारतीच्या प्रमुख डॉ.अश्विनी माळकर होत्या
          सद्याच्या धावपळीच्या व प्रदुषणयुक्त जगात वावरताना व्यक्तीगत आरोग्य चांगले व सुस्थितित ठेवणे आव्हानात्मक झाले आहे . पुरोहितांकडून होत असलेल्या पुजापाठ यामध्ये बैठेप्रकार व अखंड पणे उभ्या अवस्थेत शरिरात अनेक व्याधी विकारांची निर्मिती होते . छोटया छोट्या उपायांनी  अतिशय सोप्या पध्दतीने या विकारांवर मुक्ती कशी मिळवावी याचे मार्गदर्शन करताना वैद्य दामले यांनी खाताना भीती बाळगु नका ,खाल्यानंतर काय खाल्ले याची आठवण ठेवू नका,जेवणाची नियमित वेळ, नियमित पथ्य व पारंपरिक पदार्थांचा जेवणात वापर व जोडीला आयुर्वेदीय चौरस आहार यामुळे या प्रदूषणयुक्त जगातसुद्धा आपण शंभर वर्षे सहज जगू शकू असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
आरोग्य भारतीच्या वतीने समाजातील सर्वच घटकांसाठी यापुढे आरोग्यविषयक विविध कार्यक्रम राबविले जाणार असून दुर्गम भागात ज्या ठिकाणी औषधोपचार मिळणे अवघड आहे अशा ठिकाणी आरोग्य भारती यापुढे कार्यरत राहणार असल्याचे  अध्यक्षा डॉ अश्विनी माळकर यांनी यावेळी बोलताना सांगितले.स्वागत व प्रास्ताविक आरोग्य भारतीचे जिल्हा उपाध्यक्ष किशोर देशपांडे यांनी केले, सूत्रसंचलन सौ.सुप्रिया जोशी यानी केले , डॉ.उषा पाटील यांनी आभार मानले, कार्यक्रमास डॉ सुनील यादव, डॉ.संतोष रानडे,डॉ अनिरुद्ध कुलकर्णी,डॉ मधुरा कुलकर्णी, डॉ विद्या पवार, अमर पारगावकर, राजकुमार चौगुले, माधव कुंभोजकर आदी उपस्थित होते.

फोटो:  पुरोहितांचे आरोग्य या व्याख्यानमालेचे दीपप्रज्वलन करून प्रारंभ करताना वैद्य सुविनय दामले, अजित ठाणेकर, डॉ अश्विनी माळकर, डॉ मधुरा कुलकर्णी , डॉ विद्या पवार आदी

No comments :

Post a Comment