Powered by Blogger.

Tuesday, 11 April 2017

पत्रकार संघाच्या या सत्कारामुळे जबाबदारी वाढली - स.पो.नि.राकेश हांडे.

No comments :

सेनापती कापशी / वार्ताहर –
          सेनापती कापशी ( ता – कागल) येथे कोल्हापूर डीस्ट्रीक्ट रिपोटर्स वेलफेअर असोसिएशनच्या कागल तालुका व निपाणी परिसरातील पत्रकारांच्या मेळाव्यात मुरगूड पोलीस स्टेशनला आय एस ओ मानांकन मिळाल्याबद्दल सहायक पोलीस निरीक्षक राकेश हांडे व त्यांचे सहकारी यांचा सत्कार संस्थापक अध्यक्ष सुधाकर निर्मळे व कौन्सिल मेंबर सुरेश पाटील यांच्या हस्ते रानडे हायस्कूल च्या सांस्कृतिक सभागृहात करण्यात आला.
          यावेळी, सहायक पोलीस निरीक्षक राकेश हांडे म्हणाले, कोल्हापूर कोल्हापूर डीस्ट्रीक्ट रिपोटर्स वेलफेअर असोसिएशनच्या वतीने आय एस ओ मानांकन मिळाल्याबद्दल केलेल्या सत्कारामुळे आपली जबाबदारी वाढली आहे असे प्रतिपादन सहायक पोलीस निरीक्षक राकेश हांडे यांनी केले ते सेनापती कापशी ( ता – कागल) येथे कागल तालुका व निपाणी परिसर पत्रकार मेळावा व सत्कारसमारंभाप्रसंगी बोलत होते.
          पुढे ते म्हणाले, या सत्कारामुळे आपली व येणाऱ्या अधिकाऱ्यांची व सतत मानांकन टिकवन्याचीही जबाबदारी नकीच वाढली आहे. पत्रकार हे समाजातील महत्वाचे घटक असून पत्रकारांमुळेच कायदा व सुव्यवस्था राखण्याची फार मोठी मदत होत असते. पत्रकारांनी समाजातील चांगल्या व सकारात्मक बाबींचे लिखाण करावे यामुळे समाजात चांगले व सकारात्मक वातावरण निर्माण होईल असेही ते यावेळी म्हणाले.
         कागल तालुक्याच्या पत्रकार मेळाव्यात बोलताना संस्थापक अध्यक्ष सुधाकर निर्मळे म्हणाले, समाजात पत्रकारिता करत असताना पत्रकारांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. विशेषता ग्रामीण भागात पत्रकारिता करणे खूप कष्टाचे आहे. पत्रकारांच्यावरील वाढते हल्ले या अडचणी लक्षात घेऊनच या पत्रकार संघटनेची बांधणी केली आहे. पत्रकारांसाठी विमासंरक्षण, अनेक वर्ष पत्रकारिता केलेल्या पत्रकारांना वयाच्या पन्नास वर्षापासून पेन्शन योजना, घरकुल योजना याचबरोबर पत्रकार भवन यासारख्या अनेक अडचणी या संघटनेच्या माध्यमातून पूर्ण करणार असल्याचे ते यावेळी म्हणाले. जेष्ठ पत्रकार मधुकर भोसले, रवींद्र शिंदे, विठ्ठल कोळेकर यांनीही मनोगते व्यक्त केली.
          यावेळी, कौन्सिल मेंबर सुरेश कांबरे, सहसचिव लक्ष्मण कांबरे, जिल्हाउपाध्यक्ष अवधूत आठवले, कार्यकारिणी सदस्य नरेंद्र बोते, प्रकाश कारंडे, प्रकाश तिराळे, तालुका अध्यक्ष नंदकुमार कांबळे, तालुका कार्याध्यक्ष शशिकांत भोसले, उपाध्यक्ष विष्णुपंत इंगवले, चिक्कोडी तालुका अध्यक्ष विठ्ठल केसरकर, लक्ष्मण चावरे, सागर लोहार, समाधान म्हातुगाडे, आदि तालुक्यातील व निपाणी परिसरातील  सर्व दैनिकांचे पत्रकार, पोलीस स्टाफ उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एन. एम. मुल्ला यांनी केले.

फोटो  – सेनापती कापशी ( ता – कागल) येथे मुरगूड पोलीस स्टेशनला आय एस ओ मानांकन मिळाल्याबद्दल स.पो.नि. राकेश हांडे यांचा सत्कार करताना कोल्हापूर डीस्ट्रीक्ट रिपोटर्स वेलफेअरचे संस्थापक अध्यक्ष सुधाकर निर्मळे व सुरेश पाटील व पत्रकार.

No comments :

Post a Comment