Powered by Blogger.

Wednesday, 19 April 2017

विद्यार्थानी करिअरचे योग्य मार्गदर्शन घेतल्यास नक्कीच चांगले क्षेत्र निवडता येते - प्रतिमा पाटील

No comments :
प्रतिनिधी - संदीप पोवार कोल्हापूर
प्रतिमा सतेज पाटील सोशल वेलफेअर च्या वतीने १०वी आणि १२वी च्या विद्यार्थी, विद्यार्थीनीं करीता डी वाय पाटील इंजि. कॅम्पस साळोखे नगर येथे मोफत कार्यशाळा आयोजीत केली होती. या कार्यशाळेमध्ये इंग्रजी भाषेचे महत्व,व्यक्तिमत्वविकास,करिअर मार्गदर्शन या विषयावर नियाज काझी यानी मार्गदर्शन केले.                      
        यावेळी मार्गदर्शन करताना करवीर आदर्श महिला औद्योगिक संस्थेच्या अध्यक्षा सौ. प्रतिमा सतेज पाटील या बोलताना म्हणाल्या की, विद्यार्थी दशेत असताना विद्यार्थानी काही तरी करण्याची इच्छा शक्ती ठेवली पाहिजे, त्याच बरोबर विद्यार्थानी करिअरचे योग्य मार्गदर्शन घेतल्यास नक्कीच चांगले क्षेत्र निवडता येते असे आवाहन प्रतिमा पाटील यानी केले.
       यावेळी प्रदीप झांबरे प.स. सभापती, श्री विलास साठे, कृष्णात पाटील, संदीप गुरव आदी उपस्थित होते.

No comments :

Post a Comment