Thursday, 6 April 2017
इंडो काऊंटचे समाजकार्य दीपस्तंभाप्रमाणे
सुधाकर निर्मळे /हेरले दि.१/४/१७
इंडो काऊंट इंडस्ट्रीजचे मालक अनिलजी जैन यांनी कागल तालूका ग्रामिण आणि कोल्हापूर शहरी भागातील गरीब व होतकरू विद्यार्थ्याना आधुनिक शैक्षणिक साधनांद्वारे शिक्षण मिळावे.या उदात्त हेतूने दोन वर्षात सहा कोटी रूपये खर्च करून शंभर शाळेत स्कूल बॅग, ई लर्निंग प्रोजेक्टर, वॉटर प्युरेट आदी मोफत साहित्य दिले आहे.शिक्षण क्षेत्रात बहुजन हिताय बहुजन सुखाय या प्रणालीस मोठा हातभार लावला आहे.
इंडो काऊंट इंडस्ट्रीज ही गोकूळ शिरगाव या ठिकाणी सूतगिरणी आहे. या उदयोगाचे मालक अनिल जैन आहेत. जगात या कंपनीचा बेडशीटचा धागा बनविण्यात दुसऱ्या क्रमांकाची ख्याती आहे. देशात विविध ठिकाणी या कंपनीच्या सूतगिरण्या आहेत. या कंपनीचे मालक अनिल जैन यांना समाजसेवेचे अंग आहे. समाजाची उन्नती शिक्षणाने होते. या उदात्त हेतूने ग्रामिण शहरी भागात गरीब व होतकरू विद्यार्थी आहेत.त्यांना शैक्षणिक साहित्य मिळत नसल्याने शाळेपासून वंचित राहावे लागते. तसेच सद्याचे युग स्पर्धेचे असलेने शिक्षण क्षेत्रात प्रगल्भ होणेसाठी आधुनिक शैक्षणिक साहित्य,साधने निर्माण झाली आहेत. ही गरीब विद्यार्थ्याना मिळावित आणि त्यांना त्यांच्या शैक्षणिक प्रगतीत उपयोगी पडवीत यासाठी त्यांनी इंडो काऊंट फौंडेशनची स्थापना केली आहे. या द्वारे अनेक शाळांना शैक्षणिक साधने मोफत दिली आहेत.
इंडो काऊंट फौंडेशनचे प्रमुख डायरेक्टर कमलजी मित्रा, कार्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलीटी पी.एन. देशपांडे(सी. एस.आर.) अमोल पाटील(सी.एस.आर.) मार्गदर्शक डी.पी. गर्ग.एस.के. मोहंती आदी अधिकारी वर्ग कार्य करीत आहेत. कागल तालूका ग्रामिण व कोल्हापूर शहर भागातील १०० शाळांमधील १७००० विदयार्थ्याना चारशे रुपये किंमतीची स्कूल बॅगा मोफत दिल्या आहेत. २८०००ई लर्निंग प्रोजेक्टर एक लाख ते सव्वा लाख किंमतीचे मोफत दिले आहेत. ४६ शाळांना वीस हजार किंमतीचे वॉटर प्युवरेट ऐंशी लिटर पाण्याच्या टॉकीसहित मोफत दिले आहेत.
वीस लाख रुपये खर्च करून शुध्द जल प्रकल्प कागल एस.टी. स्टॅन्डमध्ये कोल्हापूरमधील सावित्रीबाई फुले हॉस्पीटल, महालक्ष्मी मंदिर, आदी ठिकाणी बसविले आहेत. शौचालये आठचे चार ब्लॉक म्हणजे ३२ शौचालये कोल्हापूरमध्ये उभी केली आहेत. तसेच कोल्हापूरमधील अंधशाळेसाठी तीन लाख रुपये खर्च करून ड्रेनेज व इलेक्ट्रिकची कामे करून दिली आहेत.
साठ लाख रुपये खर्च करून कोल्हापूर शहरासह ४८ गावात दोन मेडिकल व्हॅन मोफत रुग्नांना औषधोपचार करीत आहे. या व्हॅनमध्ये एक एम.बी.बी.एस. डॉक्टर, एक नर्स, एक फार्मासिस्ट, एक ड्रायव्हर आदीजन सेवा देत आहेत. या मोफत कार्याप्रमाणे दोन वर्षात सहा कोटी रुपये इंडो काऊंट फौंडशनने शिक्षण, आरोग्य, सामाजिक कार्यासाठी खर्च केले आहेत.
इंडो काऊंट फौंडशनचे प्रमुख कमल मित्रा प्रसार माध्यमाशी बोलतांना माहिती दिली,कोल्हापूरमधील सी.पी.आर.मधील ह्रदय विभागास फौंडेशनने साठ लाख रुपयांची आवश्यक सोयी, सुविधा,साधने दिली आहेत. या प्रमाणे येथील अनेक विविध विभागांना टप्प्या टप्प्याने भरीव निधी दिला जाईल.
जिल्हयात कॅन्सरचे पेशंट मोठ्या प्रमाणात आहेत. कॅन्सरमुळे घराची आर्थिक व मानसिक धूळधाण होते. अशा कुटुंबांना आधार देणेसाठी त्यांना मोफत औषधोपचार मिळावा म्हणून कॅन्सर हॉस्पिटल उभारण्याचा मानस व्यक्त केला.
सी.एस.आर.पी.एन. देशपांडे म्हणाले सद्याचे स्पर्धेचे युग असलेने गरीब व होत करू विदयार्थ्याना शैक्षणिक आवश्यक साधने मिळाल्यास त्यांना स्फुर्ती मिळते.ई लर्निंग प्रोजेक्टरच्या माध्यमातून दृक, श्राव्य ज्ञान मिळालेने आकलन क्षमता वाढते . शुद्ध पाण्याने आरोग्य सदृढ राहते. निरोगी शरीर यश मिळविण्यासाठी महत्त्वाचे असते. यासाठी फौंडेशनकडून शाळांना वॉटरप्युरेट दिली जात आहेत.
सी.एस. आर. अमोल पाटील म्हणाले की विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढण्यासाठी आणि समाजातील गोरगरीब घटकांना मानसिक व आर्थिक आधारासाठी इंडो काऊंट फौंडेशन कार्यरत आहे. या माध्यमातून कार्य करतांना समाजसेवेचा मनस्वी आनंद होतो. जे का रंजिले गांजले त्यासी म्हणावे आपुले या तत्व प्रणालीचे प्रमुख मालक अनिल जैन, डायरेक्टर कमल मित्रा यांचे कार्य अनन्य साधारण आणि दीपस्तंभा प्रमाणे आहे.
फोटो - डायरेक्टर कमलजी मित्रा यांचा सत्कार श्री शाहू हायस्कूल ज्यू कॉलेजच्या वतीने प्राचार्य महावीर रूग्गे करतांना शेजारी पी.एन. देशपांडे, अमोल पाटील व इतर मान्यवर.
Subscribe to:
Post Comments
(
Atom
)
Abhinandan .....khup changle kaam ahe he
ReplyDeleteCongrats.! Good Going.
ReplyDelete