Tuesday, 25 April 2017
शेतकरी संपूर्ण कर्जमाफी साठी संघर्ष यात्रा मेळाव्यास उपस्थित राहण्याचे आवाहन
राज्यातील शेतकर्यांना संपूर्ण कर्जमाफी दिल्याशिवाय शांत बसायच नाही. .... शेतकर्यांची कर्ज माफी झाल्याशिवाय संघर्ष थांबणार नाही असा निर्धार आमदार सतेज पाटील यांनी व्यक्त केला आहे. राज्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी देण्याच्या मागणीसाठी काँग्रेस-राष्ट्रवादीची राज्यभरामध्ये संघर्ष यात्रा सुरू आहे. कोल्हापुरात ही संघर्ष यात्रा आज २५ एप्रिल निघणार आहे. कोल्हापुरात दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास दसरा चौकात पन्हाळा, शाहूवाडी, करवीर, गगनबावडा तालुक्यांतील शेतकऱ्यांची सभा घेण्यात येणार आहे. त्यानंतर जयसिंगपूर येथे शिरोळ, हातकणंगले तालुक्यांतील शेतकऱ्यांचा मेळावा घेण्यात येणार आहे. प्रत्येक गावातील शेतकऱ्यांनी संघर्ष यात्रेचे स्वागत न करता कर्ज माफी साठी निवेदन द्यावे असे आवाहन श्री. सतेज पाटील यांनी केलं ..... आज पर्यंत दोन हजार शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या आहेत तर आणखी काय अभ्यास करणार आहे हे राज्य सरकार ...... राज्य सरकार दिशाभूल करत आहे ...... हा लढा टोकाचा आहे ....सात बारा कोरा झाल्याशिवाय संघर्ष थांबणार नाही असेही ते म्हणाले.
काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शेकाप, समाजवादी पक्ष, पीपल्स रिपब्लिकन पार्टी, रिपाइं यांची
संघर्ष यात्रा कोल्हापूर जिल्ह्यात येत आहे. त्या निमित्त आयोजित शेतकरी मेळाव्यासाठी सर्वांनी आज मंगळवार दि.25/04/2017 रोजी दु. ३.०० वा. दसरा चौक, कोल्हापूर
येथे उपस्थित रहावे..असे आवाहन आमदार सतेज उर्फ बंटी पाटील यांनी केले आहे.
No comments :
Post a Comment