Powered by Blogger.

Tuesday, 25 April 2017

माजी सरपंच श्रीकांत सांगावे यांचा एकसष्ठी निमित्त सत्कार

No comments :

कष्टाचे व्यसन श्रीकांत सांगावेंना असल्याने त्यांनी जीवनात प्रगती केली आहे. त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनी आणि मित्रांनी दिलेली साथ अजोड आहे. यामुळेच त्यांचा प्रगतशील , यशस्वी व्यावसाईक म्हणून उत्कर्ष झाला आहे. असे मत माजी महापौर प्रल्हाद चव्हाण यांनी व्यक्त केले.ते चोकाक( ता. हातकणंगले ) येथे माजी सरपंच श्रीकांत सांगावे यांच्या एकसष्ठी निमित्त आयोजित कार्यक्रम प्रसंगी बोलत होते.
           मंडप डेकोरेशन असोसिएशचे संस्थापक प्रणेते नागोजीराव धुमाळ म्हणाले की, मंडप व्यवसाय करणाऱ्या व्यक्तिंना सल्ला देत गेलो. त्यांनी त्या सल्ल्यांचा स्विकार करत कृती केल्याने व्यवसायामध्ये यशस्वी झाले. माझ्यापेक्षाही माझे सहकारी मोठे झाले,त्याचा मला मनस्वी आनंद आहे. अनंत संकटांना सामोरे जात यशाची महत्त्वकांक्षा मनी बाळगून प्रत्येक व्यक्तिने कष्टाची जोड दिल्यास निश्चितच यश मिळते.
       प्रथमतः नागोजीराव धुमाळ, माजी महापौर प्रल्हाद चव्हाण यांच्या हस्ते नूतन विशाल मंगल कार्यालयाचे फित कापून उदघाटन करण्यात आले. तदनंतर दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. तसेच माजी सरपंच श्रीकांत सांगावे यांचा सत्कारही त्यांच्या हस्ते करण्यात आला. मान्यवरांचा सत्कार पृथ्वीराज व विशाल सांगावे यांच्या हस्ते करण्यात आला. स्वागत व प्रास्ताविक माजी सभापती अविनाश बनगे यांनी केले.विनायक होगडे,जंभुकुमार देसाई, राहूल चौगुले, अजित पाटील, श्रीवर्धन सांगावे, सावंता माळी, मनसे जिल्हाअध्यक्ष गजानन जाधव यांनी मनोगते व्यक्त केली.
          याप्रसंगी माजी महापौर सागर चव्हाण, दिपक मगर , रणजित जाधव, कुबेर जोखे, कृष्णात निकम, अनिलभाई काटे, मोरे काका, किशापराव माने,तुकाराम पाटील,बाळासाहेब कदम, प्रकाश चौगुले आदी मान्यवरांसह परिसरातील सरपंच, उपसरपंच विविध संस्थांचे पदाधिकारी, तरूण मंडळांचे पदाधिकारी, ग्रामस्थ उपस्थित होते.

     फोटो
चोकाक( ता. हातकणंगले) येथे माजी सरपंच श्रीकांत सांगावे यांचा सत्कार करतांना महापौर प्रल्हाद चव्हाण , नागोजीराव धुमाळ व इतर मान्यवर (छाया- सुधाकर निर्मळे)

No comments :

Post a Comment