Powered by Blogger.

Sunday, 23 April 2017

कोल्हापूर जिल्ह्यात हजारो कोटींचं अवैध खाणकाम

No comments :
शांती टाइम्स संपादक - बाबासो जाधव

कोल्हापूर जिल्ह्यात  हजारो कोटींचं अवैध खाणकाम झाल्याचा आरोप ग्रामस्थांकडून केला जात असला तरी अजूनही हे बेकायदा खाणकाम सुरूच आहे.विशेषतः शाहूवाडी तालुका हा जैवविविधतेने समृद्ध असलेल्या आणि युनेस्कोने जागतिक वारसा स्थळाचा दर्जा दिलेल्या पश्चिम घाटाची ओळख आहे .जैववैविध्याचा अनमोल साठा सांभाळणारा, भारतातल्या मान्सूनवर प्रभाव पाडणारा पश्‍चिम घाट अश्या अवैध खाणकामामुळे नष्ट होण्याच्या मार्गावर आहे ,या भागाला जागतिक वारशाचा दर्जा मिळवून देऊन भागणार नाही तर पश्चिम घाटाच्या संवर्धनासाठी पर्यावरण कायद्यांचीही काटेकोर अंमलबजावणी व्हायला हवी.मायनिंगच्या अवैध खाणकामाबाबत धक्कादायक माहिती समोर आलीय.
              अवैध खाणकाम करणाऱ्यांना कायद्यानुसार पाच वर्षांचा कारावास  व प्रती हेक्टर पाच लाख रुपये दंड होऊ शकतो असा कायदा असला तरी आतापर्यंत कोल्हापूर जिल्ह्यात कोणालाही अशी शिक्षा झालेली नाही याचा अर्थ स्थानिक प्रशासनाला हाताला धरून काही धनदांडगे व खाणमाफिया यांनी सह्याद्रीच्या पर्वत रांगा अक्षरशः पोखरून त्यांची चाळण केली आहे .
              पश्चिम घाटावर धनदांडग्यांनी पैशाच्या जोरावर ठिकठिकाणी जमिनी बळकावल्या आहेत.विशेषशतः काही ठिकाणी सरकारी जमिनीवरही अवैध खाणकाम सुरु आहे अशावेळी पर्यावरण खाते झोपले आहे काय अशी विचारणा जनसामान्यातून होत आहे

No comments :

Post a Comment