Thursday, 27 April 2017
बिल भरल्याशिवाय पेशंटला डिस्चार्ज न देणार्या हॉस्पिटलला हायकोर्टाने फटकारलं
प्रतिनिधी - ज्ञानराज पाटील
.
नुकतेच दिल्ली उच्च न्यायालयाने खाजगी रुग्णालयांच्या नफेखोरीच्या धोरणावर तीव्र नापसंती व्यक्त करत बिलासाठी पेशंटला डिस्चार्ज न देणार्या हॉस्पिटलला हायकोर्टाने फटकारलं आहे.
एकाचे वडील दिल्लीतील औषध उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल झाले होते. त्यांच्यावरील औषधोपचारांचे बिल साडे सोळा लाख एवढे लावण्यात आले. याचिकाकर्त्याने त्यापैकी साडे तीन लाख रुपये रुग्णालयात भरले होते. मात्र, उर्वरित थकित रकमेसाठी रुग्णालयाने त्याच्या वडिलांना डिस्चार्ज देण्यास नकार दिला होता. त्याविरोधात त्याने दिल्ली हायकोर्टात धाव घेतली. व इतर हॉस्पिटलच्या तुलनेत अवास्तव बिल आकारणी केली हे निदर्शनास आणून दिले, याचिकेवर न्या. सांघी आणि न्या. शर्मा यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. त्याप्रसंगी रुग्णाने बिल थकवले असले तरी त्याला डिस्चार्ज द्या, असे आदेश रुग्णालयाला दिले.
No comments :
Post a Comment