Powered by Blogger.

Wednesday, 26 April 2017

चिले महाराज भंडारा महोत्सव भक्ताच्या गर्दीत मोठ्या उत्साहात संपन्न

No comments :

प्रतिनिधी  कृष्णांत हिरवे

प.पु.चिले महाराज समाधी मंदिर श्री.क्षेत्र पैजारवाडी ( ता.पन्हाळा ) येथे चिले महाराज भंडारा महोत्सव  भक्ताच्या गर्दीत चिलेमय वातावरणात मोठ्या उत्साहात पार पडला. 

http://saptahikshantitimes.blogspot.nl/2017/04/blog-post_26.html?m=1


बुधवार दि.१९ एप्रिल, पासून बुधवार दि. २६ एप्रिल २०१७, पर्यत या भंडारा महोत्सवात दररोज श्री नां अभिषेक ,त्रिकाल आरती , भजन, कीर्तन, प्रवचन, गुरुचरित्र पारायण व अखंड नामविन्याचे आयोजन केले होते.
मंगळवार दि. २५ रोजी १२ ते ४ वा. या वेळेत महाप्रसाद वितरण करून साय. ६ ते रात्री ११ वा. पर्यत श्रीचां पालखी सोहळा सम्पन्न झाला
बुधवार दि. २६ रोजी सकाळी ९ वा. काल्याचे कीर्तन झाले .
१२ वा.गोपालकाल्याची हंडी फोडून महाप्रसादा चे वाटप करणेत आले या भंडारा महोत्सवाचा व महाप्रसादाचा हजारो भाविक भक्तांनी लाभ घेतला.
आलेल्या भाविकांची आरोग्याची काळजी घेण्याकरिता प्राथमिक आरोग्य केंद्र बोरपाडळे  व सुरक्षाव्यवस्थेसाठी कोडोली पोलिस स्टेशन पथकानी महत्वाचे सहकार्य करून योग्य सेवा ती बजावली, हा महोत्सव पार पाडण्यास संस्थानाचे अध्यक्ष श्री.बाबासाहेब चव्हाण व्यवस्थापक - बाबुराव गराडे, सचिव - विनायकराव जाधव, विश्वस्त - जयसिंग पारखे, बी. के. घोसाळकर,चंद्रप्रकाश पाटील ( खुटाळे ) यांचे विशेष परिश्रम व सहकार्य लाभले.
                      

No comments :

Post a Comment