Powered by Blogger.

Friday, 28 April 2017

शिवनाकवाडी (ता. शिरोळ) आदर्श "शिवजयंती व बसवेश्वर " जयंती साजरी

No comments :

प्रतिनिधी - सतिश लोहार

          आदर्श सर्वांनी घ्यावा अशी जयंती साजरी शिवनाकवाडी (ता. शिरोळ जि . कोल्हापूर ) गावा मध्ये वेगळया पध्दतीने  "शिवजयंती व बसवेश्वर " जयंती साजरी करण्यात आली , 
       शिवनाकवाडी गावातील अहिल्यादेवी होळकर सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने, रयतचे राजे ,मनावर राज्य करणारे राजे म्हणजे
राजा शिवछत्रपती व संपूर्ण जगाला  मानवतावादी विचारांची शिकवण देणारे महात्मा बसवेश्वर महाराज यांची जयंती एकत्रितपणे  ग्रंथालयातच साजरी करण्यात आली , वाचनालयात  करण्याचे कारण म्हणजे त्यातून मुलांना वाचनाची आवड लाघावी हा हेतू होता , ग्रंथालय हे पवित्र ज्ञानदानाचे ठिकाण जर आपल्याला चांगले घडायचे असेल तर पुस्तके वाचली पाहिजेत , आत्मचरित्र वाचले पाहिजेत , नुसतीच  जयंती साजरी न करता त्यांचे विचार लोकांच्या मनात रुजवणे गरजेच आहे आणि हे फक्त वाचनातूनच घडू शकते आणि तो आदर्श आज सर्वांच्या समोर शिवनाकवाडी गावाने ठेवला आहे असा उपक्रम राबवून आगळ्या  वेगळ्या अशा भारतीय संस्कृतीचे दर्शन घडवून आणल , या शुर वीरांच्या गाता जर अशा प्रकारे नवीन अशा उपक्रमातून जर आपण समाजामध्ये जागृती करत गेलो तर नक्कीच आपण सर्वजण जीवनात काही तरी चांगले मिळवू शकतो व त्यातून आपला , दुसऱ्याचा , गावाचा म्हणजेच देशाचा विकास घडवू शकतो. या जयंती निमीत्य फोटो पूजन  करण्यासाठी गावातील ज्येष्ठ व्यक्ती , नागरीक , गावचे पोलीस पाटील , शिक्षक , डॉक्टर ,  विविध मंडळातील मुले, कार्यकर्ते उपस्थित होते अशा प्रकारे चांगल्या प्रकारचा उपक्रम राबवल्या बदल शिवनाकवाडी गावचे व गावातील अशा चांगल्या उपक्रमास दिशा देणाऱ्या नागरीकांचे  अभिनंदन व आभार सर्वांनीच शिवनाकवाडी गावचा आदर्श  घेणे गरजेचे आहे....

No comments :

Post a Comment