Powered by Blogger.

Sunday, 30 April 2017

०१ मे आंतरराष्ट्रीय कामगार दिन व संयुक्त महाराष्ट्र राज्य स्थापन दिन निमित्य थोडक्यात ...

No comments :


हेरले / प्रतिनिधी :
       उद्योगपती, भांडवलदार, कारखानदार, पूर्वी कांमगारांना गुलाम म्हणून १२ ते १४ तास राबवून घेत होते . कामगारांची पिळवणूक खुप प्रमाणात करत असत. या सर्वाचा परिणाम म्हणून अमेरीकेत कारखान्यात काम करणाऱ्या सर्व कामगारांनी अंदोलनाला सुरुवात केली व एक दिवस सर्वजण शिकागो येथील हेय मार्केट जवळ जमून निदर्शने करू लागली. खूप मोठा कामगार वर्ग आंदोलन स्थळी जमा झाला व परिस्थिती नियत्रंणा बाहेर जायला लागली जमावावर सरकारी यंत्रणेने गोळीबार केला व त्यामध्ये ६ ते ७ कामगारांचा बळी गेला त्यामुळे आंदोलक कामगार खूप उग्र झाले.जे कामगार आंदोलक शहीद झाले त्यांच्या रक्तामध्ये कापड भिजवून लाल रंगाचा झेंडा फडकवला व या १मे १८८६ पासून कामगार दिनाची सुरुवात झाली.पूढे अंदोलनाल तिव्र झाले व न्यायालयात खटला दाखल झाला परिणामी कामगारांच्या लढ्याला यश आले व  कामाचे तास ८ तास करावे लागले.
    पूढे १ मे १८९१ पासून हा दिवस आंतरराष्ट्रीय कामगार दिन म्हणून जवळपास ८० देशामध्ये साजरा / पाळला केला जाऊ लागला. कामगारांच्या योगदानाला सलाम करणेसाठी १ मे हा कामगार दिन म्हणून साजरा केला जातो, पाळला जातो. विविध ८० देशात सार्वजनिक सुट्टी तसेच कामगार कार्यक्रम आयोजन हे सरकार, कामगार संघटना, उद्योजक हे उत्कृष्ट काम करणाऱ्या कामगाराचा गौरव करतात.
      भारतात ०१ मे १९२३ या दिवशी मद्रास दिवस म्हणून भारतीय मजदूर किसान पार्टी चे कॉ . सिंगरावेलू चेत्ता आर यांनी मद्रास हायकोर्ट जमून हा दिवस कामगार दिन म्हणून साजरा / पाळणेचे ठरविले.
      महाराष्ट्रामध्ये राज्य पुर्नरचना आयोगाने मुंबई महाराष्ट्राला देण्याचे नाकारले. त्यामुळे मराठी माणूसे चिडली व सगळीकडे सभा, मोर्चे, आंदोलने , निषेध, झाला व त्यातुनच मुंबईत कामगारांचा एक विशाल मोर्चा फ्लोरा फाउंटना समोरील चौकात जमला, चर्चगेट, बोरीबंदर, या दिशेने ही मोठे मोर्चे आले, निदर्शने, घोषणा नी सारा परिसर दणानला व नित्रंणन हाताबाहेर गेले व मुंबई राज्यांचे तत्कालीन मुख्यमंत्री मोरारजी देसाई यांनी जमावावर लाठीचार्ज, गोळीबार करण्यास सांगीतले व या आंदोलनात १०५ अंदोलक हुतात्मे झाले. त्यांच बलिदान व मराठी माणसांचे आंदोलन यापूढे सरकारने नमते घेतले व ०१ मे १९६० रोजी मुंबईसह महाराष्ट्र स्थापन
झाला.
    परंतु सध्य स्थितीत कामगार दिन हा कामगारांचा राहीला नाही. त्याला राजकीय महत्व प्राप्त झाले व झेडांवदन हे एखादया निवृत, गुणवंत, पुरस्कार प्राप्त कामगारांच्या हस्ते करणेचे सोडून मुख्यमंत्री, पालकमंत्री, जिल्हाधिकारी, यांचे हस्ते सुरू झाले, म्हणजे हा राजकीय कार्यक्रम झाला.
आमचे कामगार मित्र हा दिवस फार तर मौजमजा करण्यात घालवतात व कामगार दिनाचे महत्त्व विसरून गेलेत. संघटीत  होऊन लढा देऊ शकत नाहीत व आपल्या कामात व्यस्त राहतात. जाईल की तो माझ काय काम आहे अशी वृती झाली आहे.
त्यामुळे असंघटीत क्षेत्रामध्ये काम करणारे कामगार ९०ते ९२ टक्के आहेत त्याच्यासाठी लढा दिला पाहीजे त्यांना न्याय, हक्क मिळवून दिले पाहीजेत यासाठी कायम कामगारानी लढा उभारला पाहीजे तो लढा ते उभारू शकत नाहीत आपली नोकरी कशी वाचेल ते पाहतात. त्याच बरोबर समान काम समान वेतन या सर्वोच्य न्यायालयाच्या निकालाप्रमाने अंमंलबजावणी करायला पाहीजे तेही होत नाही.
     अशाप्रकारे कामगार दिन ही राजकीय लोकांच्या शोभेची वस्तु झाली आहे. जोपर्यंत एखादया निवृत, गुणवंत कामगारांच्या हस्ते कामगार दिन साजरा होत नाही तोपर्यंत कामगार दिनाला किंमत आहे अस म्हणता येणार नाहीं. आमचा हा कामगार दिनाचा निरोप प्रशासना पर्यंत पोचेल अशी अपेक्षा व त्यांना सुबुद्धी प्राप्त होवो , जगभरातील माझ्या सर्व कामगार बांधवाना व महाराष्ट्रातील १०५ हुतात्म्यांना लाल सलाम.

कामगार दिनाच्या हार्दीक शुभेच्छा!

        श्रमिक संघटना
जनरल सेक्रटरी- कॉ. प्रकाश कांबरे.

No comments :

Post a Comment