Saturday, 29 April 2017
हेरले (ता.हातकणंगले) येथे उरूस निमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यकमांचे आयोजन
हेरले /प्रतिनिधी दि. २९/४/१७
हेरले (ता.हातकणंगले) येथे हजरत पीर माँसाहेब, हजरत पीर जबरबेग साहेब यांचा उरूस बुधवार दि.३ मे ते ६ मे या दरम्यान होत असून या निमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यकमांचे आयोजन केले आहे. अशी माहिती उरूस कमिटी अध्यक्ष इलाई देसाई उपाध्यक्ष राजेंद्र कचरे यांनी दिली.
बुधवार दि. ३ मे रोजी संदल ( गंधरात्र) रात्रौ मंजुर जानी कव्वाल पार्टी मुंबई व आरजू बानू कव्वाल पार्टी नागपूर यांच्यात कव्वालीचा जंगी मुकाबला उदघाटन आम. डॉ. सुजित मिणचेकर, माजी आमदार राजू आवळे , माजी सभापती राजेश पाटील, धैर्यशील माने, सरपंच बालेचाँद जमादार, ए.पी.आय. अस्लम खतीब ,मुनीर जमादार, माजी सरपंच रियाज जमादार,यांच्या उपस्थित होणार आहे.
गुरूवार दि.४ मे रोजी लता लंका पाचेगांवकर यांचा लोकनाट्य तमाशा उदघाटक केशव मिरजे रंगराव कोळेकर आदींच्या उपस्थित होणार आहे.
शुक्रवार दि.५ मे रोजी दुपारी ४वाजता कुस्त्यांचे जंगी मैदान उदघाटक फिरोज मुजावर, भरत कराळे युवराज वड्ड यांच्या उपस्थित होणार आहे.रात्रौ १० वा.ऑर्केस्ट्रा उदघाटक पोलीस निरीक्षक सी.बी. भालके, जिल्हा पत्रकार संघ अध्यक्ष सुधाकर निर्मळे, सलीम खतीब, दत्तात्रय खांडेकर , कुमार जाधव, शरद निंबाळकर, बाजीराव हवलदार , सयाजी गायकवाड, शिवाजी वड्ड यांच्या प्रमुख उपस्थित होणार आहे. उरुस पंच कमिटी अध्यक्ष इलाई देसाई , उपाध्यक्ष राजेंद्र कचरे, महमंद खतीब , दस्तगीर खतीब, इमाम खतीब आदींनी संयोजन केले आहे.
No comments :
Post a Comment