Wednesday, 5 April 2017
जिओच्या सेटटॉप बॉक्सचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल - केबल व इतर डीशची लावणार वाट ?
By Dnyanraj Patil
सोशल मीडियावर जिओच्या सेट टॉप बॉक्सची काही फोटो व्हायरल झाली आहेत.
रिलायन्स जिओच्या लोगोसह सेट टॉप बॉक्सचे फोटो सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत आहेत. जिओच्या डीटीएच सेवेत 360 चॅनल्स असतील, त्यापैकी 50 चॅनल्स एचडी असतील, असं मेसेज व्हायरल होत आहेत.
डेटाप्रमाणेच जिओ डीटीएच सेवाही सर्वात स्वस्त दरात देणार असल्याची चर्चा आहे. 450 रुपये या सेट टॉप बॉक्सची किंमत असेल, पहिल्या सहा महिन्यांसाठी 360 चॅनेल्स मोफत पाहता येतील, त्यानंतर 360 चॅनल्ससाठी 120 रुपये प्रति महिना या दराने पैसे मोजावे लागणार , असं मेसेजमध्ये म्हटलं आहे.
यापूर्वी जिओने मोफत डेटा सेवा लाँच केल्यानंतर दूरसंचार क्षेत्रात ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी स्पर्धा सुरु झाली. यामध्ये अनेक कंपन्यांनी कॉल आणि डेटा दर मोठ्या प्रमाणात कमी केले तरीही प्रतिस्पर्धी कंपनीन्यांना फार मोठा तोटा झाला आहे
No comments :
Post a Comment