Sunday, 9 April 2017
शिक्षणमहर्षि स्व. पांडुरंग हिरवे यांचे जीवनावर आधारित टेलीफिल्म चा शूटिंग शुभारंभ
शिक्षणमहर्षि स्वर्गीय पांडुरंग विठ्ठल हिरवे (गुरुजी ) यांचे जीवनावर आधारित माणदेशी फिल्म पुणे निर्मित टेलीफिल्म चा शूटिंग शुभारंभ ग्रामदैवत नृसिंह मंदीर श्री.क्षेत्र पैजारवाडी ता.पन्हाळा येथे रविवार दि.09/04/2017 रोजी सकाळी ठीक 09.00 वा. पन्हाळा - शाहूवाडी विधानसभा भाजप संपर्क प्रमुख श्री.अजितसिंह काटकर ,श्री.शिवाजी मोरे जि. प.सदस्य ,क्राईम डायरी चे संपादक बाबासाहेब जाधव, या प्रमुख मान्यवरांच्या शुभ हस्ते संपन्न झाला.कोल्हापूर ,सांगली ,रत्नागिरी,जिल्ह्यतील खेडयामध्ये मुलांना शिक्षण मिळावे या उदात्या हेतूने 1953 साली 100 - प्राथमिक शाळा, 2 -हायस्कुल, 1 - वस्तीगृह चालू करून गोर गरीब मुलांना मोफत शिक्षण दिले अशा या महान कार्य करणाऱ्या हिरवे गुरुजींची ओळख सम्पूर्ण महाराष्ट्राला या फिल्मच्या माध्यमातून व्हावी असे वक्तव्य श्री.काटकर यांनी केले.त्या अल्पावधीत काळात शाळा स्थापन करण्याचा विक्रम जागतिक स्थरावर नोंद करण्या सारखी आहे असे जि. प.सदस्य शिवाजी मोरे यांनी मत व्यक्त केले . या वेळी फिल्ममधील प्रमुख कलाकाराचा मान्यवरांच्या हस्ते स्वागत करण्यात आले या कार्यक्रमास शिक्षणमहर्षि स्वर्गीय पांडुरंग विठ्ठल हिरवे गुरुजी स्मारक समीती हिरवे गुरुजीचेे सहकारी, विद्यार्थी वर्ग ,नातेवाईक, माजी शिक्षक ,पत्रकार व सर्व ग्रामस्थ उपस्थित होते.
No comments :
Post a Comment