Saturday, 13 May 2017
पेट्रोल पंप चालक आंदोलन तूर्तास स्थगित, रविवारी पंप सुरू राहणार
तेल कंपन्या आणि पंपचालक यांच्यात कमीशनच्या मुद्द्यावरून वाद होता आणि त्यामुळेच पंप चालकांना खर्च परवडत नव्हते त्यामुळे खर्च कमी करण्याचा निर्णय़ पंप चालकांनी घेतला आणि एकाच शिफ्टमध्ये पंप सुरू ठेवण्याचा आणि आठवड्याच्या रविवारी पंप पूर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता,
मात्र मेस्मा अंतर्गत कारवाई करणार असं सरकारने जाहीर केल्यामुळे पंप चालकांनी आपलं आंदोलन तूर्तास तरी स्थगित केलंय तसेच तेल कंपन्यानी 17 मे रोजी पंपचालकांना चर्चेसाठी बोलावलं असून त्यानंतर आंदोलनाची पुढची दिशा ठरवली जाईल,
त्यामुळे उद्या रविवारी सर्व पेट्रोल पंप सुरू राहणार आहेत असे विश्वसनीय सूत्रांकडून समजते.
Subscribe to:
Post Comments
(
Atom
)
No comments :
Post a Comment