Powered by Blogger.

Friday, 12 May 2017

केएमटी कंड़क्टरकडून १० रु.चे नाणे स्वीकारण्यास नकार

No comments :


१० रुपयांची नाणी रिजर्व बँकेकडून चलनात असल्याचे जाहीर करूनसुद्धा  केएमटी कंड़क्टरकडून १० रु.चे नाणे स्वीकारण्यास सर्रास नकार दिला जात आहे,प्रवाश्याना १० रुपयांची नाणी बंद झाली आहेत असे खोटे सांगून एकप्रकारे अफवाच पसरवत आहेत ,तर कधी कधी १० रुपयांचे नाणे असेल तर गाडीतून खाली उतारा असा अपमान केला जात आहे ,एखाद्या सुशिक्षित प्रवाशाने जास्तच प्रकरण ताणवले  तर तिथे कुठे तक्रार करायची तिथे करा कोणाच्या बापाला घाबरत नाही असे सुनावले जाते.आधीच  तोट्यात असलेल्या केएमटी ला फायद्यात आणण्याऐवजी अश्या प्रकारे प्रवाश्याना अडचणीत आणून  केएमटी ला आणखीन खड्ड्यातच घालण्याचे काम काही कंडक्टर करत आहेत

No comments :

Post a Comment