Powered by Blogger.

Monday, 15 May 2017

मौजे वडगांव येथे श्री महादेव मंदिर कलशारोहण समारंभ निमित्ताने विविध कार्यक्रमाचे आयोजन

No comments :

हेरले/ प्रतिनिधी दि .१४/ ५/१७

हातकणंगले तालूक्यातील मौजे वडगांव येथे श्री महादेव मंदिर कलशारोहण समारंभ बुधवार दि. १७ मे ते गुरुवार दि. १८ मे रोजी विविध धार्मिक विधिवत  कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.
    बुधवार दि. १७ मे रोजी सायंकाळी ४ वाजता श्री गुरु रविशंकर शिवाचार्य रायपाटणकर महाराज श्री वीरशैव रेवणसिद्ध मठ रत्नागिरी यांच्या सानिध्यात कुंभ कलशाची सवाद्द मिरवणूक , सायं.७ वा. सर्व कलश जलाधिवास रात्री १२वा. धान्य वास.
    गुरूवार दि. १८ मे रोजी पहाटे ५वा. निद्रा वास, ५. ३०वा.पूजा विधी आरंभ, सकाळी ८वा.शंभू महादेव कलश अभिषेक , स.९.१५वा. होमहवन, १०.१५वा. कलशारोहण, ११वा. गुरूवर्य प्रवचन मंगलारती .११. 30 वा.प.पू. श्री महेशआनंद स्वामीजी यांचे आशिर्वचन, उपस्थिती प.पू. श्री सदगुरू विनयानंद महाराज निरंजन मठ , दुपारी १२वा. महाप्रसाद वाटप. या कार्यक्रमाचा जिल्हयातील सर्व महादेवभक्तांनी लाभ घ्यावा असे आवाहन श्री वीरशैव लिंगायत समाजव बसवसेना यांच्या वतीने केले आहे.

No comments :

Post a Comment