Monday, 15 May 2017
मौजे वडगांव ग्रामपंचायतीच्या वतीने वृक्षारोपण
हेरले/ प्रतिनिधी दि. १५/ ५/१७
हातकणंगले तालूक्यातील मौजे वडगांव ग्रामपंचायतीच्या वतीने गायरान माळावर विविध प्रजातीच्या दोनशे वृक्षांचे सरपंच सतिश चौगुले यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.
झाडे लावा झाडे जगवा या सामाजिक वनिकरण योजनेतून गाव तलाव शेजारी गायरानामध्ये गर्द झाडी व्हावी. या उद्देशाने सरपंच सतिश चौगुले यांच्या प्रेरणेतून वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न झाला. या झाडांचे संगोपन करण्याचे कार्य रूपेश घारगे, सिकंदर मुल्ला करणार आहेत. याप्रसंगी गटनेते श्रीकांत सावंत, शाखाप्रमुख माजी उपसरपंच सुरेश कांबरे, सतिश वाकरेकर, स्वप्निल चौगुले, प्रदिप लोहार, सुनिल खारेपाटणे, अनंत जाधव, महादेव शिंदे, ज्ञानेश्वर सावंत , मंगेश गोरड, आनंदा पोवार आदी मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण संपन्न झाले.
फोटो - मौजे वडगाव( ता. हातकणंगले) येथे ग्रामपंचायतीच्या वतीने सरपंच सतिश चौगुले वृक्षारोपण करतांना शेजारी इतर मान्यवर.
No comments :
Post a Comment