Monday, 15 May 2017
व्हायरसच्या भीतीमुळे अपडेशनसाठी एटीएम सेवा बंद राहण्याची शक्यता
रॅनसमवेअर व्हायरसच्या भीतीमुळे रिझर्व्ह बँकेने सर्व बँकांना एटीएमच्या सुरक्षासाठी सिस्टम अपडेट करण्याच्या सूचना दिल्या आहेत. भारतातील 70 टक्के एटीएम अशा आऊटडेटेड सॉफ्टवेअरचा वापर करतात, ज्यांना सहजपणे हॅक केलं जाऊ शकतं. खबरदारीचा उपाय म्हणून अँटी व्हायरसच्या अपडेटची तातडीने गरज आहे, एटीएम सिस्टम अपडेट करण्यासाठी दिवसातील दोन ते तीन तास एटीएम बंद राहू शकतात. दरम्यान एटीएम तीन ते चार दिवस बंद राहणार, अशीही शक्यता वर्तवण्यात येत आहे त्यामुळे नागरिकांनी पुरेशा रोख रकमेची तजवीज केल्यास उत्तम !
Subscribe to:
Post Comments
(
Atom
)

No comments :
Post a Comment