Monday, 15 May 2017
राष्ट्रीय एड्स नियंत्रण संस्था व शासनाकडून NGO कर्मचार्यांचे डिसेंबर ते एप्रिल अनुदान थकीत, कर्मचार्यांवर उपासमारीची वेळ
लक्ष्मण कांबरे हेरले/ वार्ताहर दि. १४/५/१७
राष्ट्रीय एड्स नियंत्रण संस्था,नवी दिल्ली,महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण सोसायटी,मुंबई यांच्या कडून महाराष्ट्र राज्यातील अशासकीय सामाजिक संस्थाना एच .आय. व्ही/ एड्स जनजागृती अभियान राबवण्यासाठी देण्यात येणारे अनुदान डिसेंबर २०१६ ते एप्रिल २०१७ या पाच महिन्यापासून मिळाले नसल्याने एड्स नियंत्रण व प्रतिबंध साठी कार्यरत असणाऱ्या अशासकीय संस्थांमधील हजारो कर्मचाऱ्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे.माहे डिसेंबर ते माहे एप्रिल या पाच महिन्याचे अनुदान थकीत असल्याने कर्मचारी वर्ग हवालदिल झाला असून पगाराअभावी कौटूंबिक गरजा भागवणे, आजारपण, यासारख्या प्रश्नामुळे ग्रासून गेला असून शासनाने अशासकीय संस्थाचे अनुदान वेळेवर अदा करावे अशी मागणी कर्मचारी वर्गामधून होत आहे.
केंद्र सरकार व महाराष्ट्र राज्य सरकार आणि आरोग्य विभाग यांच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्था यांच्याकडून अशासकीय संस्थांना एड्स जनजागृती अभियान राबविण्यासाठी अशासकीय संस्थांना प्रत्येक प्रकल्पला निधी दिला जातो .या माध्यमातून एच. आय .व्ही/ एड्स जनजागृती साठी मोफत पथनाट्य, माहिती ,शिक्षण, संवाद,कंडोम प्रात्यक्षिक,कंडोम सोशल मार्केटिंग, इव्हेंट्स ,समुपदेशन,मोफत आरोग्य शिबीर ,एच .आय. व्ही संसर्गिताची काळजी त्यांना आधार देऊन शासकीय रुग्णालयात मोफत औषध उपचार साठी पाठवणे यासह अन्य समुदायासाठी विविधांगी कार्यक्रम या उपक्रमव्दारे मोफत मार्गदर्शन केले जाते .त्यासाठी प्रत्येक अशासकीय संस्था मध्ये प्रकल्प व्यवस्थापक ,समुपदेशक, मूल्यमापन व देखभाल अधिकारी, समुदाय संघटक ,पिअर लीडर, आरोग्यमित्र, सामाजिक कार्यकर्ते याची नेमणूक केलेली आहे .
या सेवाभावी संस्थाच्या माध्यमातून मोफत आरोग्य शिबिरातून एच. आय. व्ही व गुप्तरोग तपासणीसाठी सल्ला मार्गदर्शन केले जाते.एच आय व्ही शून्यावर आणण्यासाठी प्रकल्प स्तरावर विविध कार्यक्रम राबविले जातात.स्थंलातरीत कामगार लक्षगट हस्तक्षेप प्रकल्प ,कोअर कॉम्पोसाईट टी आय अंतर्गत देह विक्रय स्त्रिया व तृतीय पंथी यांना गुप्तरोग,एच .आय. व्ही/एड्स,लेंगिक समस्या या विषयी मोठ्या प्रमाणात कर्मचारी वर्ग मोफत आरोग्य शिबीरातून जनजागृती करत आहेत. एच .आय .व्ही संसर्गित लोकाची काळजी व त्यांना आधार देण्याबरोबर जोखमीच्या तृतीय पंथी, देहविक्रय स्त्रिया,एमएसएम, डीडी, कोथी, पंणती या घटकाला मोफत मार्गदर्शन करण्यात येते.
सामान्य व्यक्ती एच.आय.व्ही व गुप्तरोगाच्या जाळ्यात अडकले जाऊ नयेत म्हणून कामगार वर्ग सातत्याने याविषयी जनजागृती करत आहे.
अशासकीय संस्थाना दिलेल्या अनुदानातून सामाजिक बांधिलकी डोळ्यापुढे ठेऊन विविध ठिकाणी एड्स जनजागृतीचे उपक्रम राबवले जात आहेत.
सामान्य माणूस एड्स या विषयीच्या माहितीपासून दूर जाऊ नये व त्याला या रोगाची लागण होऊ नये म्हणून जास्त धोका,कमी धोका,मध्यम धोका या वर्गवारीतील लोकांना मोफत आरोग्य सेवा देण्याबरोबर मोफत औषधेही शासकीय रुग्णालयातुन देन्यात येत आहेत.
सेक्सुयल ऍक्टिव्हिटीकडे प्रवाहित होणाऱ्या लोकांना एच. आय. व्ही /एड्स व गुप्तरोगाचा धोका अधिक असतो म्हणून प्रकल्प स्तरावर मोफत कंडोम प्रात्यक्षिक व त्या विषयी माहिती दिली जाते.एच .आय.व्ही च्या विळखा कमी करण्यासाठी कामगार वर्ग माहिती देऊन त्यांना या गोष्टी पासून अलिप्त राहण्यासासाठी मार्गदर्शन करत आहे.
कोल्हापूर जिल्ह्यात एनजीओ च्या माध्यमातून एड्स विषयी मोठ्या प्रमाणात जनजागृती होत असताना अशासकीय संस्थांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना पगारा अभावी दैनंदिन गरजा भागवणे मुश्किल झाले असून गेल्या डिसेंबर ते एप्रिल पर्यंत चे अनुदान थकीत असल्याने पगार वेळेवर झाले नाहीत एम्सँक्स मुंबई या विभागाने दखल घेऊन स्थंलातरीत कामगार लक्ष गट हस्तक्षेप या प्रकल्पाच्या माध्यमातून एच आय व्ही,गुप्तरोग, एड्स,क्षयरोग या विषयी मोफत माहिती देणाऱ्या कर्मचार्याच्यावर आलेली उपासमार थांबवण्यासाठी अनुदान त्वरित अदा करावे अशी मागणी कामगार वर्गातून होत आहे .
फोटो :-पोस्टर प्रदर्शनातून एड्स जनजागृती करताना सामाजिक कार्यकर्ते
No comments :
Post a Comment