Wednesday, 17 May 2017
निमशिरगावमध्ये वादळी वाऱ्यामुळे ग्रीन हाऊसचे नुकसान
हेरले /प्रतिनिधी दि. १७/५/१७
शिरोळ तालूक्यातील निमशिरगावमधील युवराज वसंत कांबळे यांच्या एक एकरातील ग्रीन हाऊसचे वादळी वाऱ्यामुळे अंदाजे चार ते पाच लाखाचे नुकसान झाले.
निमशिरगावामध्ये युवराज कांबळे यांची गट नंबर ४८१/१ मध्ये अडीच एकर शेती आहे. यामधील त्यांनी एक एकर क्षेत्रात गुलाब उत्पादनासाठी ग्रीन हाऊस दोन वर्षापूर्वी दहा ते बारा लाख रूपये खर्च करून बांधले होते. मागील काही दिवसामध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाला यामध्ये या ग्रीन हाऊसचे छत उडून जाऊन सागांडा साहित्यांची मोठया प्रमाणात मोडतोड होऊन अंदाजे पाच लाखापर्यंत नुकसान झाले आहे.
फोटो - निमशिरगाव -येथे वादळी वाऱ्याच्या अवकाळी पावसामुळे ग्रीन हाऊसची उडालेले छत व साहित्याची .झालेली मोडतोड.
Subscribe to:
Post Comments
(
Atom
)
No comments :
Post a Comment