Wednesday, 17 May 2017
स्वाभिमानी शिक्षक सेवाभावी संघाच्या वतीने निर्धार मेळावा आयोजन
लक्ष्मण कांबरे/ हेरले प्रतिनिधी दि.१७/५/१७                                                  स्वाभिमानी प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षक सेवाभावी संघाच्या वतीने  शिक्षण क्षेत्रातील शिक्षकांच्या समस्या बाबत चर्चा व  नवनविन ध्येयधोरणा विषयी निर्धार मेळावा शनिवार दि. २o मे रोजी मौजे तासगाव ( ता. हातकणंगले) येथील छत्रपती शिवाजी विद्यानिकेतन मध्ये आयोजित केला आहे.
      या मेळाव्याचे अध्यक्षपद शिक्षण उपसंचालक एम .के. गोंधळी भूषवणार आहेत. प्रमुख पाहुणे इंडोकांऊट इंडस्ट्रिजचे एम.डी. तथा इंडो कांऊट फौंडेशनचे अध्यक्ष कमल मित्रा असतील. प्रमुख उपस्थिती माध्यमिक शिक्षणाधिकारी टी. एल. मोळे , शिक्षण निरीक्षक डी.एस. पोवार, लेखा अधिकारी अजित शिंदे, वेतनपथक अधिक्षक शंकरराव मोरे, इंडोकांउंट फौंडेशनचे अधिकारी पी.एन. देशपांडे आदी मान्यवरांचे मेळाव्यास मार्गदर्शन लाभणार आहे.
         प्राथमिक माध्यमिक् उच्च माध्यमिक शिक्षकांच्या नविन पदांच्या मान्यता, बारा वर्षांनंतर वरिष्ठ श्रेणी मान्यता, निवडश्रेणी मान्यता, सेवा पुस्तीका भरणे, फंडांच्या पावत्या , लिपीक, ग्रंथपाल, प्रयोगशाळा सहाय्यक,परिचर, शिक्षकेत्तर कर्मचारी आदी सेवकांच्या समस्या व जुन्या पेन्शनबद्दल तीव्र लढा या बद्दल सुसंवाद थेट शिक्षण क्षेत्रातील अधिकाऱ्यांशी साधून सेवकांची रेंगाळलेली कामे पुर्णत्वास येण्यासाठी उपाययोजना अशी चर्चा होणार आहे. तरी कोल्हापूर जिल्हयातील तीन्ही स्तरातील शिक्षकांनी व शिक्षेकेत्तर कर्मचाऱ्यांनी या कार्यक्रमास उपस्थित राहून  लाभ घ्यावा असे आवाहन संस्थापक अध्यक्ष सुधाकर निर्मळे यांनी पत्रकार परिषदेद्वारे केले आहे. पत्रकार परिषदेस शिक्षक नेते मुख्याध्यापक राजेंद्र माने, प्रा. भास्कर चंदनशिवे, पोपटराव वाकसे, जिल्हाध्यक्ष मिलींद बारवडे , प्रविण देसाई,लक्ष्मण कांबरे, जिल्हा कार्याध्यक्ष अभिजित गायकवाड, कादर जमादार, नरेंद्र बोते, सरचिटणीस भरत शास्त्री, संघटक फुलसिंग जाधव, संपर्क प्रमुख पांडुरंग पाटील, खजानिस नंदकुमार कांबळे आदी उपस्थित होते.
 

 
No comments :
Post a Comment