Wednesday, 3 May 2017
तूर खरेदीमध्ये व्यापाऱ्यांकडून हजारो शेतकर्यांची खुलेआम लूट
केंद्राने या वर्षीच्या हंगामात तुरीसाठी साडे पाच हजार रुपये क्विंटल हमीभाव जाहीर केला होता ,पण राज्यातली सर्व खरेदी केंद्रे बंद करून, तूर उत्पादक शेतकर्यांना वार्यावर सोडायचा घेतलेला निर्णय शेतकर्यांना खड्ड्यात घालणारा आहे त्यामुळे सरकारने खरेदी केंद्रे बंद करताच, व्यापार्यांनी तुरीचा खरेदी भाव प्रतिक्विंटल 1500 ते 2000 रुपयांनी पाडून शेतकर्यांची अधिकच कोंडी केली.
गेल्या वर्षी खुल्या बाजारात तूर डाळीचे भाव 200 रुपये किलो असे आकाशाला भिडल्याने शेतकर्यांनी तुरीला चांगला भाव मिळेल, या अपेक्षेने मान्सूनच्या हंगामात तुरीच्या अधिक क्षेत्रात पेरण्या केल्या.कृषी खाते आणि पणन खात्याचे तुरीचे उत्पादनाचे सारेच अंदाज साफ चुकले आणि तुरीचे प्रचंड विक्रमी उत्पादन झाले. राज्यात तुरीचे उत्पादन किती होणार हे कृषी खात्याला सांगता आले नाही.केंद्र सरकारने तूर खरेदी केेंद्रे बंद केल्याची सबब सांगून,राज्यातली सर्व खरेदी केंद्रे बंद करून, तूर उत्पादक शेतकर्यांना वार्यावर सोडले आहे.आजही तूर डाळीचे दर 100 रुपये प्रति किलो असताना फक्त 15 ते 20 रुपयांनी तूर खरेदी करणे हा अन्यायच आहे .
Subscribe to:
Post Comments
(
Atom
)
No comments :
Post a Comment