Tuesday, 30 May 2017
आत्मक्लेश यात्रेस हेरलेचे सरपंच हाजी बालेचाँद जमादार यांचा पाठींबा
हेरले/ प्रतिनिधी दि. ३० मे १७
खासदार राजू शेट्टी यांनी पुणे ते मुंबई राजभवन पर्यंत काढलेल्या आत्मक्लेश यात्रेस हेरले गावचे सरपंच हाजी बालेचाँद जमादार यांनी भेट देऊन यात्रेस पाठींबा दर्शविला.
सत्तेत असूनही शेतकऱ्यांच्या हक्कासाठी लढावे लागत आहे. या सरकारने शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे. शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव दिला पाहीजे, त्याचबरोबर शेतकऱ्यांचे कर्ज पूर्णपणे माफ झाले पाहिजे, शेतीमालावरील निर्यातबंदी उठवली तर या देशातील शेतकऱ्यांच्या हातात पैसे येतील. अन्यथा मालाला हमीभाव दिला गेला नाही तर त्यांचे लाखो रुपयांचे नुकसान होईल.एवढेच नाही तर यामुळेच आत्महत्याही होत आहेत. मात्र, या सरकारने याकडे दुर्लक्ष केले आहे. असे आरोप या आत्मक्लेश यात्रेत खासदार राजू शेट्टी यांनी करून पुणे ते मुंबई पायी यात्रा काढली.
या आत्मक्लेश पद यात्रेस सरपंच बालेचाँद जमादार, मनिर जमादार, कुभार इंगळे, उदय चौगुले, रमेश कदम आदीसह कार्यकर्त्यांनी भेट देऊन पदयात्रेतील सर्वांसाठी भोजनाची व्यवस्थाही केली.
फोटो - आत्मक्लेश यात्रेत खासदार राजू शेट्टी यांना भेटून विचारपूस करतांना सरपंच बालेचाँद जमादार व इतर मान्यवर.
No comments :
Post a Comment