Wednesday, 31 May 2017
शिक्षण उपसंचालक एम.के. गोंधळी यांना स्वाभिमानी शिक्षक सेवाभावी संघाच्या वतीने मागण्यांचे निवेदन
हेरले/ प्रतिनिधी दि. ३१ मे १७.
कोल्हापूर जिल्हयातील माध्यमिक शिक्षकांची वरिष्ठ श्रेणी व निवड श्रेणी मान्यता प्रस्ताव माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालयाकडे अनेक महिन्यांपासून प्रलंबित आहेत. तरी ते प्रस्ताव जिल्हा लेखाधिकारी यांच्याकडे मान्यतेसाठी तात्काळ हस्तांतरीत करावेत अशी मागणी स्वाभिमानी प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षक सेवाभावी संघ यांच्या वतीने लेखी निवेदनाद्वारे शिक्षण उपसंचालक एम.के. गोंधळी यांच्याकडे करण्यात आली.
कोल्हापूर येथील शिक्षण उपसंचालक कार्यालयात प्राथमिक ते उच्च माध्यमिक शिक्षकाच्या विविध समस्या बाबत आढावा बैठकीत वरील मागणी संघाच्या पदाधिकाऱ्यांनी केली.
माध्यमिक शिक्षकांची वरिष्ठ श्रेणी व निवड श्रेणी मान्यता यापूर्वी माध्यमिक शिक्षणाधिकारी यांच्याकडून घेतली जात होती. मात्र सद्यस्थितीत काही दिवसापूर्वी शिक्षण उपसंचालक एम.के. गोंधळी यांनी जिल्हा लेखाधिकारी यांच्या अधिकारात संबधित दोन्ही श्रेणीच्या मान्यता देण्याचा आदेश काढला आहे. त्या आदेशानुसार शिक्षणाधिकारी यांच्याकडे यापूर्वी काही महिन्यापासून वरिष्ठ व निवड श्रेणी मान्यतेसाठी प्रस्ताव प्रलंबित आहेत. तरी या नूतन आदेशानुसार शिक्षणाधिकारी यांच्याकडील प्रस्ताव तात्काळ जिल्हा लेखाधिकारी यांच्याकडे हस्तातंरीत व्हावेत जेणेकरून लेखाधिकारी तात्काळ मान्यता कॅम्प आयोजित करून प्रलंबीत प्रस्तावांना मान्यता देतील त्यामुळे रखडलेले मान्यता प्रस्तावांची कामे पुर्णत्वास येऊन शिक्षकांना न्याय मिळेल . यावेळी सदरचे आदेश तात्काळ विनाविलंब जिल्हा लेखाधिकारी यांच्याकडे वर्ग करण्याचे आदेश तात्काळ काढ़ण्याचे आश्वासन शिष्ट मंडळाला दिले. वेतनपथक अधिक्षक शंकरराव मोरे उपस्थित होते.
यावेळी स्वाभिमानी प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षक सेवाभावी संघाचे संस्थापक अध्यक्ष सुधाकर निर्मळे, शिक्षक नेते पोपटराव वाकसे, जिल्हाध्यक्ष लक्ष्मण कांबरे, कार्याध्यक्ष कादर जमादार , कागल तालूकाध्यक्ष भाऊसाहेब सकट, कोल्हापूर शहर कार्याध्यक्ष उस्मान मुकादम, तालूका उपाध्यक्ष सुरेश चव्हाण आदी उपस्थित होते.
फोटो - शिक्षण उपसंचालक एम.के. गोंधळी यांना निवेदन देताना अध्यक्ष सुधाकर निर्मळे, शिक्षक नेते पोपटराव वाकसे व अन्य पदाधिकारी.
No comments :
Post a Comment