Thursday, 1 June 2017
सर्वसामान्यांसाठी झटणारे व्यक्तिमत्व बाबासाहेब जाधव यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा!
बाबासाहेब जाधव यांच्यासारखे व्यक्तीमत्व अनेक वर्षांच्या कामांतून आणि अथक परिश्रमांतून घडते. त्यांच्या आयुष्यात रात्रंदिवस अनेकविध प्रसंग येतात. अग्निपरीक्षेत उत्तीर्ण झालेले नेतृत्व हे स्वयंसिद्ध आणि स्वयंप्रकाशित असते. लोककल्याणासाठी सातत्याने झटणारा व्यक्ती च लोकमानसात उतरतो, हे वेगळे सांगण्याची आवश्यकता नाही. बाबासाहेब यांचे व्यक्तीमत्व हे लोकमानसात पूर्णपणे मुरलेले आहे. असा माणूस सत्तेवर असला काय किंवा नसला काय, तो लोकांच्या विळख्यातच असतो. तो आपली नाळ लोकांपासून तुटू देत नाही. लोकांच्या नाडीवर बोट ठेवून तो लोकांशी संवाद साधतो. बाबासाहेबांचा लोकसंपर्क रावांपासून रंकांपर्यंत आहे. लोकशाहीत लोकसंग्रह हीच खरी संपत्ती असते.
गेल्या कित्येक वर्षांपासून मी बाबांना तटस्थपणे पाहतो आहे. सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून त्यांनी कामांचा डोंगर रचला आणि कर्तृत्वाचा सह्याद्री उभा केला. त्यांची बांधिलकी वरवरची नाही. बांधिलकी कलम करता येत नाही, हे एका ठिकाणी म्हटले आहे. ती मुळातूनच उगवावी व वाढावी लागते. . राजकारण हे साधन असते आणि असले पाहिजे, समाजकारण हे साध्य असते, या गोष्टीचे भान या बाबासाहेबांना आहे.
राजकारण आणि समाजकारण यात बाबासाहेबांनी सामाजिक प्रश्नांना प्राधान्य दिले आहे, त्याचे कारण हेच आहे.
बाबासाहेबांचे व्यक्तीमत्व आता राज्य पातळीवर स्थिरावले आहे. राज्यात त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा एक वेगळाच आदरयुक्त दबदबा निर्माण झाला आहे.
सुरुवातीला एक पत्रकार म्हणून काम करत त्यांनी आता संपादक व ग्रुप अॉफ मिडिया अध्यक्ष पद उत्तमरीत्या सांभाळले आहे.
एका सामान्य कुटुंबात जन्म घेतलेल्या बाबासाहेबांनी मिळालेल्या संधीचं सोनं केलं! ते त्यांच्या अफाट कर्तृत्वशक्तीमुळे! बेधडक व बेडर वृत्ती हा तर बाबांचा स्थायी स्वभाव!
सर्वसामान्य लोकांपर्यंत प्रत्यक्ष संपर्क, कोणत्याही गावाला कोणाकडेही शुभ काम असो, दु:खद प्रसंग असो किंवा कुणीही परिचित दवाखान्यात असो तेथे बाबा पोहचतात, सामान्य लोकांमध्ये बसतात, सर्वांशी दिलखुलास गप्पा मारणार, पुन्हा पुढील गावाकडे असा दिनक्रम सतत सुरु असतो.
पत्रकारिता करताना सर्वसामान्य लोकांच्या कामांमध्ये दिरंगाई करणार्या, चालढकल करणार्या अधिकार्याला धारेवर धरणार पण याच अधिकार्यांची चांगल्या पध्दतीने काम केल्यास जाहिरपणे त्या अधिकार्यांचे कौतुक करायलाही तेवढाच मनाचा मोठेपणा ते दाखवतात.
सर्वांशी संवाद ठेवणारा, सर्वसामान्यांना न्याय मिळवून देणारा, सातत्याने लोकांच्या समस्यांसाठी रस्त्यावर हा माणुस सतत फिरत असतो. त्यांच्या पायाला ‘भिंगरी’च आहे असे वाटावे असा सतत फिरणारा हा सर्वसामान्य पत्रकार जनतेसाठी एक आधार आहे!
आम्हाला सतत प्रोत्साहीत करणार्या बाबासाहेबांना उत्तम आरोग्य मिळो, त्यांच्या हातुन पत्रकारितेत आणखी कामे होवोत, त्यांचे कर्तृत्व अधिक अफाट होवो यासाठी मा. बाबासाहेबांना वाढदिवसानिमित्त मनःपूर्वक कोटी-कोटी शुभेच्छा!
बाबासाहेबांना शुभेच्छा देण्यासाठी संपर्क 9822299904
No comments :
Post a Comment