Powered by Blogger.

Thursday, 4 May 2017

मौजे वडगांव येथे बिरदेव मंदिर स्लॅब शुभारंभ

No comments :

हेरले / प्रतिनिधी : दि. ४/५/१७
       मौजे वडगांव ( ता. हातकणंगले ) येथील बिरदेव मंदिरचा स्लॅब शुभारंभ तांबवे इन्स्टिटय़ूटचे संस्थापक राजेश तांबवे यांच्या शुभहस्ते व पुजारी देबाजी मामा  यांचे प्रमुख उपस्थित संपन्न झाला.
     मंदिर उभारणीसाठी राजेश तांबवे यांनी भरीव निधी दिला असुन सदरचे मंदिराचे काम हे लोकवर्गणीतुन सुरू आहे , लवकरच पुर्णत्वाच्या दिशेने वाटचाल असुन समाजातील प्रमुख मंडळी वर्गणीसाठी गावोगांव फिरून मंदिरासाठी निधी उभा करत आहेत .
       या स्लॅब शुभारंभ प्रसंगी तांबवे सर्विसेसचे जनरल मॅनेजर विरसिंह पाटील, सरपंच सतिश चौगुले , पोलीस पाटील अमिर हजारी,माजी उसरपंच सुरेश कांबरे कॉ.प्रकाश कांबरे, गणपती भेंडेकर, यशवंत गोरड,संजय गोरड, बापू शेंडगे, आनंदा गोरड, कृष्णा भेंडेकर, बापू भेंडेकर, मारूती शेंडगे, आण्णासो गोरड, बाबासो लांडगे, स्लॅब विधी प्रसाद जंगम यानी केले, प्रास्तविक विजय गोरड यांनी तर आभार श्री दत्त सेवा सोसायटी उपसभापती कृष्णात गोरड यांनी मांडले.
         फोटो - मौजे वडगांव( ता. हातकणंगले)येथे बिरदेव मंदिराच्या स्लॅब शुभारंभ प्रसंगी राजेश तांबवे, सरपंच सतिश चौगुलेसह इतर मान्यवर .

No comments :

Post a Comment