Sunday, 11 June 2017
पेट्रोल-डिझेलचे दर दररोज बदल विरोधात दि. 16 जूनपासून पेट्रोल पंप चालकांचा देशव्यापी बंद
दररोज दर बदलण्याच्या निर्णयाला आक्षेप घेत सर्व पेट्रोल पंप चालकांनी बंदची हाक दिली आहे. 16 जूनपासून पेट्रोल पंप चालक देशव्यापी संप करणार आहेत . 16 ते 24 जूनदरम्यान देशभरातील सर्व पेट्रोल पंपांवर पेट्रोल आणि डिझेलची खरेदी-विक्री बंद ठेवण्याचा निर्णय डिलर्स असोसिएशननं जाहीर केला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या भावात दररोज चढ-उतार होत असल्यानं दरदिवशी पेट्रोल-डिझेलचे दर बदलण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. मात्र या निर्णयाला फेडरेशन ऑफ ऑल इंडिया पेट्रोलियम डिलर्सने विरोध दर्शवला आहे.
Subscribe to:
Post Comments
(
Atom
)
No comments :
Post a Comment