Sunday, 11 June 2017
योग शिबीर
प्रतिनिधी सतिश लोहार ....
शिवनाकवाडी, ता . शिरोळ जि . कोल्हापूर या ठिकाणी आज रविवार दि 11 /6/2017 पासुन मोफत योग शिबीर संत बाळुमामा सभागृह शिवनाकवाडी या ठिकाणी सुरु झाले आहे , या सात दिवसांच्या शिबीरामध्ये प्रामुख्याने योगासनाच्या विविध पध्दती , सुर्य नमस्कार, प्राणायम , विविध आसने , विविध व्यायामाचे प्रकार, प्रार्थना , आपणास शिकता येणार आहे , आजचे जीवन ताणतणावाचे बनले आहे , जीवन खुप सुंदर आहे या सुंदर जीवनाचा आनंद घेण्यासाठी आपले शरीर चांगले असणे गरजेचे आहे , शरीर चांगले असण्यासाठी आपले मन स्थिर व प्रसन्न असले पाहिजे , योगासनामुळे आपले आरोग्य सुधारते मन स्थिर होते , मन प्रसन्न होते त्यामुळे,आपली एकाग्रता वाढते , आपली पचनक्रिया सुधारते , आपल्या सर्व प्रकारच्या , शारिरीक व मानसिक व्याधी योग अभ्यास सरावाने नाहीशा होतात , त्यामुळे आनंदी जीवनासाठी , आनंदी आरोग्यासाठी , आनंदी मनासाठी योगशिबीराचा सर्वांनी लाभ घ्यावा . या शिबीरासाठी इंचलकरंजी होऊन संपूर्ण योग प्रशिक्षीका सौ. मंगल खोत मॅडम , गावातीलच योग प्रशिक्षक श्री विवेक खोत सर (पोलीस पाटील ) , योग प्रशिक्षक डॉ.संतोष उमराणे सर , योग प्रशिक्षक श्री सुखदेव खोत सर यांच्या मार्गदर्शनाखाली योग शिबीराला सुरुवात ,झाली आहे आज फोटो पूजन करून योग अभ्यासाला सुरुवात झाली आहे गावातील मान्यवर व्यक्तींनी सर्व प्रशिक्षकांचे स्वागत केले व आभार मानले तरी सर्वानी या शिबीराचा लाभ घेण्यात यावा .....
No comments :
Post a Comment