Powered by Blogger.

Sunday, 11 June 2017

मौजे वडगांव येथे शिवराज्याभिषेक दिन मोठ्या उत्साहात संपन्न

No comments :

हेरले / प्रतिनिधी :

मौजे वडगांव ( ता. हातकणंगले ) येथे शिवराज्याभिषेक दिन विविध कार्यक्रमांनी मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
      धावण्याच्या स्पर्धा लहान व मोठा गटामध्ये  घेण्यात आल्या त्यामध्ये अनुक्रमे कमांक

मोठा गट
प्रथम रोहीत शितल परमाज
द्वितीय सुजित रणजित रजपूत
तृतीय युनुस पिंपरे

     लहान गट
प्रथम संकल्प डोळे
द्वितीय रोहीत रणजित रजपूत
तृतीय मोईन अमिर हजारी

रांगोळ ओपन स्पर्धा
प्रथम शामबाला मस्के ( इंचल )
द्वितीयविशाल कांबळे
तृतीय शैलेष ढेरे -विभागुन
यश अकिवाटे
उत्तेजनार्थ
मेघा भोसले

यांना प्रकाश कांबरे, पिंटू मोरे, संगीता कांबरे, गणेश मोरे, समाधान भेडेकर यांच्या हस्ते रोख बक्षिस देण्यात आले .
     किल्ले पन्हाळगड वरून ज्योत आणण्यात आली तसेच प्रसाद जंंगम  व सहकारी अशा नामवंत १२  पंडित यांच्या हस्ते राज्याभिषेक करण्यात आला. दुपारी महाप्रसाद वाटप करण्यात आले.
गावातुन प्रमुख मार्गावरून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या रायगड वरील मुर्तीप्रमाणे असनाऱ्या मुर्तीची भव्य दिव्य अशी कराडच्या ढोल ताशा पथकाकडून मिरवणुक काढण्यात आली.
   वैभवलक्ष्मी ब्लड बँक यांच्या देखरेखीखाली ३५ते ४० तरूणानी रक्तदान केले . शिवराज्यभिषेक समीती  यांच्या नियोजनात हा कार्यक्रम संपन्न झाला. यामध्ये मंडळाचे आधारस्तंभ पिंटू मोरे, समाधान भेंडेकर , रणजित रजपूत, प्रशांत पाटील, निखील, स्वप्नील पाटील, राहूल, अभिजीत भोसले, रोहीत चौगुले, महेश मुरगुंडे, सलमान नाईक,यांनी परिश्नम घेतले.

फोटो - रक्तदान करताना मंडळाचे पिंटू मोरे व राजकुमार थोरवत

No comments :

Post a Comment