Friday, 9 June 2017
व्हन्नुर येथील तलावाचे विशेष दुरुस्तीच्या कामाला प्रारंभ. समरजितसिंह घाटगे यांच्या प्रयत्नाना यश
सिद्धनेर्ली (वार्ताहर - रवींद्र पाटील)
व्हन्नुर ता कागल येथिल असणार्या पिंपळगाव तलावास गळती लागल्याने दर वर्षी लाखो लिटर पाणी वाया जात होते . त्या मुळे मुबलक प्रमाणत पाणी साठा होत नव्हता . व्हन्नुर वासियांना आईन उन्हाळ्याच्या दिवसात पाण्यासाठी वन वन करावी लागत होती .त्यामुळे या तलाव्याच्या दुरुस्तीची मागणी गावातून होत होती. या साठी व्हन्नुर गावातील शाहू कारखान्याचे संचालक टी .ए. कांबळे यांच्या नेतृत्वाखाली शिष्ट मंडळ स्थापन करून म्हाडाचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे याना भेटून या समस्येबदल कल्पना दिली होती . त्याचाच पाठपुरावा म्हणून घाटगे यांनी तत्काळ पाटबंधारे विभागातील अभियंत्यांना या तलावाच्या दुरुस्तीची मागणी केली असता पाठबंदारे विभागाने त्वरित काम पूर्ण करून देऊ असे आश्वासन देत कामाला सुरवात केली आहे . सदर काम पावसाळ्याच्या आत पूर्ण करून देऊ असे सांगत कामाला गती देत हे काम पुर्ण क्षमतेने चालू असून लवकरच पूर्णत्वाकडे जाणार आहे त्या मुळे येत्या पावसाळ्यात या तलावात मोठ्या प्रमाणावर जल साठा होऊन त्याचा फायदा व्हन्नुर वासियांना होणार आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण पसरले आहे .
फोटो – व्हन्नुर येथील तलावाच्या कामाच्या शुभांरंभ प्रसंगी टी .ए. कांबळे, ए. एस . कांबळे व इतर मान्यवर
No comments :
Post a Comment