Friday, 9 June 2017
सिध्दनेर्ली येथे पंतप्रधान उज्ज्वला गँस योजनेअंतर्गत सौ नवोदिता घाटगे यांच्या हस्ते लाभार्थीना गँस वितरण
सिध्दनेर्ली दि 9. रविंद्र पाटील
केंद्र व राज्य शासनाच्या अनेक चांगल्या योजना सर्वसामान्यापर्यत पोहचत नाहीत भाजपा तर्फे या योजना लोकांच्या दारापर्यत पोचविल्या जातील असे प्रतिपादन सौ नवोदिता घाटगे यांनी केले त्या सिध्दनेर्ली येथे पंतप्रधान उज्ज्वला गँस योजनेअंतर्गत लाभार्थीना गँस वितरण प्रसंगी बोलत होत्या. अध्यक्षपदी कागल बँकेचे चेअरमन एम पी पाटीलहोते . यावेळी सौ नवोदिता घाटगे पुढे म्हणाल्या उज्वला गँस योजना महिलासाठी चांगली आहे कारण चुलीवर जेवण करताना किती व कसा त्रास होतो किती आजारांना तोंड द्यावे लागते हे महिलांनाच माहित असते तो कमी करणेचे काम आपण करणार आहे, केद्र सरकारच्या सर्व योजना जनतेच्या हक्काचे आहेत त्या त्याचेपर्यत पोचविणेचे काम म्हाडा अध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांचे मार्फत आम्ही करणार आहे, महिलासाठी राजमाता जिजाऊ संघटनेच्या माध्यमातुन लघुउद्योग,गृहउद्योग, ग्रीन हाउस, कंपोष्ट प्रकल्प यासाठी मदत केली जाईल. यावेळीबोलताना कागल बँकेचे चेअरमन एम पी पाटील म्हणाले शतकमहोत्सवी वर्षात एका सर्वसामान्य कार्यकर्ता ला कागल बँकेचे चेअरमन करून समरजितसिंह घाटगे यांनी ग्रामीण जनतेचा सन्मान केला आहे, बँकेमार्फत महिलांना सर्व प्रकारची मदत केली जाईल,त्यांना कर्जपुरवठा करून स्वताचे पायावर उभे केले जाईल. यावेळी उज्ज्वल योजनेमधील 51 लाभार्थी यांना सौ नवोदिता घाटगे यांचे हस्ते कनेक्शन वाटप करणेत आले प्रा सुनिलमगदुम, सरपंच निता पाटील, पुष्पलता मगदुम यांनी मनोगत व्यक्त केले स्वागत व प्रास्ताविक रमेश कांबळे, तर आभार रमण पाटील यांनी मानले. कार्यक्रमासाठी कागल बँक व्हा चेअरमन चंदर गाडीवड्ड, बळीराम मगदुम, वाय व्ही पाटील, बालकृष्ण घराळ शितल घाटगेयांचेसह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
~ फोटो ~ सिध्दनेर्ली येथे गँस कनेक्शन वितरण करताना सौ नवोदिता घाटगे व मान्यवर.
No comments :
Post a Comment