Thursday, 29 June 2017
सामाजिक जाणिवेतून 400 वारकऱ्यांना मोफत औषधे वितरण
कोल्हापूर प्रतिनिधी
कोल्हापूर ते पंढरपूर पायी दिंडीमध्ये कोल्हापूर आणि परिसरातील हजारो वारकरी पायी चालत असतात, दररोज सुमारे 25 ते 30 किमी अंतर ऊन पावसाची तमा न बाळगता ही आबालवृद्ध मंडळी पार करतात.
ज्या पद्धतीने आळंदी ते पंढरपूर पायी दिंडीमध्ये वारकऱ्यांना सरकार आणि सेवा संस्था यांच्या वतीने औषधोपचारासाठी पथक तयार असतात तसे कोल्हापूर ते पंढरपूर पायी दिंडी मार्गावर काहीच सोय नसते.
याची दखल घेऊन कोल्हापूर येथील महालक्ष्मी मेडिकल चे ज्ञानराज पाटील व त्यांचे सहकारी मित्र हे दिंडीमध्ये दरवर्षी भोसे ता. मिरज येथे मोफत प्रथमोपचार औषध सेवा देतात.
पायी चालत असताना पायाला फोड येतात, पाय व गुडघे दुखतात यासाठी वेदनाशामक गोळ्या व मलम दिले जाते तसेच सर्दी, ताप, पित्त, उष्णता, संडास, ऊलटी यावर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार गोळ्या दिल्या जातात तसेच चालताना अशक्तपणा येऊ नये म्हणून ओ आर एस पावडर व बिस्किटे दिली जातात.
काल दि. 28 जुन रोजी प्रति वर्षी प्रमाणे याही वेळी अंदाजे 400 ते 500 पायी चालणाऱ्या वारकऱ्यांना मोफत औषधे वितरण करण्यात आली यावेळी नगरसेवक सुभाष बुचडे, तानाजी चव्हाण, श्रीहरी पाटील, बाजीराव कारंडे, भाऊसाहेब ठोंबरे, मदन जामदार आदी प्रमुख उपस्थित होते.
यावेळी या उपक्रमास वारकरी मंडळींनी माऊली चा गजर करीत भरघोस प्रतिसाद दिला व अशा समाजोपयोगी कार्यासाठी भरभरून शुभेच्छा दिल्या.
सदर मोफत औषध वितरण करताना ज्ञानराज पाटील यांना दिलीप सुतार, भरत जावळे, दिपक परब, किरण पाटील, सुरज घाडगे आदिंचे मोलाचे सहकार्य लाभले.
फोटो - कोल्हापूर ते पंढरपूर पायी दिंडीमध्ये वारकऱ्यांना मोफत औषधे वितरण करताना
No comments :
Post a Comment