Monday, 26 June 2017
हेरले (ता. हातकणंगले) येथे ग्रामपंचायतीच्या वतीने पंधरा बालवाडी भौतिक सुविधा व पस्तीस दिव्यांगांना अर्थसहाय्य
हेरले/ प्रतिनिधी दि. २६/६/१७
हेरले (ता. हातकणंगले) येथे ग्रामपंचायतीच्या वतीने पंधरा बालवाडी भौतिक सुविधा व पस्तीस दिव्यांगांना अर्थसहाय्य देण्यात आले.
सरपंच बालेचाँद जमादार यांनी ग्रामपंचायतीच्यावतीने गावातील पंधरा बालवाडींना प्रत्येकी एक तिजोरी टेबल खुर्ची या भौतिक सुविधा देण्यात आल्या. तसेच गावातील पस्तीस दिव्यांग लहान थोरांना प्रत्येकी १९oo रूपयांचे अनुदान वितरीत करण्यात आले. या प्रसंगी जिल्हा परिषद सदस्या डॉ. पद्माराणी पाटील, पं.स. सदस्या महेरनिगा जमादार, गुरूनाथ नाईक, अशोक मुंडे, ग्रामविकास अधिकार संतोष चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते
फोटो
हेरले येथे ग्रामपंचायतीमध्ये सरपंच बालेचाँद जमादार लाभार्थींना अनुदान वितरित करतांना शेजारी जि.प. सदस्या डॉ. पद्माराणी पाटील, पं.स. सदस्या महेरनिगा जमादार व अन्य मान्यवर
Subscribe to:
Post Comments
(
Atom
)
No comments :
Post a Comment