Powered by Blogger.

Tuesday, 13 June 2017

सद्गुरू चिले महाराजांचे मुख्य शक्ती पीठ असलेले भैरवनाथ मंदिराचे काम पूर्णत्वाकडे

No comments :

प्रतिनिधी - कृष्णात  हिरवे 

पन्हाळा तालुक्यातील जेऊर येथील सद्गुरू चिले महाराजांचे मुख्य शक्ती पीठ असलेले भैरवनाथ मंदिराचे काम पूर्णत्वाकडे चालले आहे.
       सद्गुरू चिले महाराज यांचे जन्मस्थान असलेल्या जेऊर गावात महाराजांचे लहान पानापासूनच या मंदिरात वास्तव्य असायचे .पुढे त्यांना दैवत्व प्राप्त झाले नंतर अनेक भक्ताचे कल्याण या मंदिरातून केले.त्या काळी चिले महाराज  ! शिखराच देऊळ हुनार ! असे गुण गुणत असत.
चिले महाराजांच्या पश्चात  दत्त मंदिर संस्थान मोर्वे , हिंगमीरे महाराज धोंडीराम महाराज,यांच्या पुढाकाराने सांगली, सातारा,रत्नागिरी, पुणे,ठाणे, कोल्हापूर, येथील भक्तांच्या सहकार्याने हे मंदिर पूर्णत्वाकडे जात आहे. प्राचीन अष्टभैरवा पैकी एक भैरव असणाऱ्या या मंदिराला ऐतिहासिक वारसा लाभला आहे. स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज,धर्मविर संभाजी राजे, लोकराजा शाहू महाराज,या सर्वांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या मंदिरात मसाईदेवी, विसपावल,यांची स्वयंभू प्राचीन पाषाने असून अनेक भक्तांचे श्रद्धास्थान आहे.लवकरच चिले महाराजांची मूर्ती प्राणप्रतिष्ठापना मंदिर कलशारोहन होत असल्याची माहिती भैरवनाथ देवस्थान ट्रस्टचे सचिव तानाजी पाटील यांनी दिली.

No comments :

Post a Comment