Powered by Blogger.

Thursday, 15 June 2017

शिक्षणाबरोबर क्रीडा कौशल्य प्रशिक्षण महत्वाचे - प्रवचनकार डॉ श्रीकृष्ण देशमुख

No comments :

मुरगुड प्रतिनिधी - समीर कटके

          क्रीडा कौशल्यात क्रिमी लेअर मध्ये असणाऱ्या सक्षम खेळाडूंची  संख्या कमी असणे हे ऑलिम्पिक स्पर्धातील असमाधानकारक कामगिरीस कारणीभूत ठरते. अशा खेळाडूंना हेरून त्याचे प्रशिक्षण व सरावाची गरज असते.शिक्षणाबरोबर शारीरिक क्षमतांच्या विकासास अभ्यासक्रमात असणे तितकेच महत्वाचे ठरते. बौद्धिक कौशल्यांना आत्मसात करताना त्यांना शारीरिक कृतींची जोड देणारा हा उपक्रम सर्वांच्या साहाय्याने यशस्वी होईल असा विश्वास आंतराष्ट्रीय कीर्तीचे प्रवचनकार डॉ श्रीकृष्ण देशमुख यांनी व्यक्त केला.
               मुरगुड ता कागल येथील विश्वनाथराव पाटील शिक्षण संस्थेच्या फिटनेस अँड स्पोर्ट्स अकॅडमीच्या शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते.यावेळी समाज कल्याण अधिकारी निवृत्त मेजर सुभाष सासने प्रमुख उपस्थिती होते .
       प्रारंभी अकॅडेमीचे उदघाटन डॉ देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बोलताना मेजर सासने म्हणाले बौद्धिक क्षमतेच्या विकासासाठी शारीरिक क्षमतांचा विकास, खेळातील नैपुण्य अधिक उपयुक्त ठरते. स्पोर्टस व फिजिकल ट्रेनर पदी काम करताना हजारो खेळाडू पहिले पण ऑलिम्पिक दर्जाची गुणवत्ता क्वचित दिसून येते. ही पोकळी भरून बौद्धिक व शारीरिक क्षमता विकसित करण्यासाठी स्वरचित मोड्युल देणारी ही पहिलीच संस्था आहे. 
         यावेळी माजी नगराध्यक्ष प्रविणसिंह पाटील, अजितसिंह पाटील, भागोजी कुंभार, सखामामा डेळेेकर, बाळासो पाटील, बाळासो आंगज, शिवाजीराव पाटील, आनंदराव कल्याणकर, विजय पाटील, सत्यजित पाटील,नगरसेवक राहुल वंडकर,जयवंत हावळ, वसंतराव शिंदे,बाळासाहेब सूर्यवंशी, नामदेव भांदिगरे, जगन्नाथ पुजारी,राजू आमते, विश्वासराव घाटगे, प्रकाश भोसले, पृथ्वीराज कदम, जीवन भोसले, आनंदा पाटील, संभाजी पाटील, एम बी ठाणेकर, रघुनाथ बोगार्डे, दत्ता आंगज, शिवाजी शेणवी आदी उपस्थित होते.
       स्वागत चंद्रकांत माळवदे यांनी केले प्रास्ताविक संस्थेचे अध्यक्ष दिग्विजय पाटील यांनी केले. सूत्रसंचालन व आभार अॅड.सुधीर सावर्डेकर यांनी मानले.

फोटो - मुरगुड येथील फिटनेस अँड स्पोर्ट्स अकॅडमीचे उदघाटन करताना डॉ श्रीकृष्ण देशमुख शेजारी मेजर सुभाष सासने ,प्रविणसिंह पाटील, अजितसिंह पाटील व अन्य   

No comments :

Post a Comment