Powered by Blogger.

Friday, 16 June 2017

पैजारवाडी सरपंच पदी जनसुराज्यच्या सौ.अलका हिरवे यांची निवड

No comments :

प्रतिनिधी - कृष्णात हिरवे

ग्रामपंचायत पैजारवाडी सरपंच पदी जनसुराज्य पक्षाच्या सौ.अलका महादेव हिरवे यांची निवड झाली.
विद्यमान सरपंच दीपाली साठे यांनी पदाचा राजीनामा दिल्यानंतर रिक्त सरपंच पदासाठी सौ अलका महादेव हिरवे व सौ.सुरेख कृष्णात चिले यांनी उमेदवारी अर्ज केला होता.ग्रा.पं.सदस्यानि हात वर करून मतदान केले व 4 - 3 अशा फरकाने सौ.अलका हिरवे विजयी होऊन सरपंच झाल्या.  ग्रामसेवक सागर पाटील व त्रिवेणी पाटील तलाठी यांनी निवडणूक प्रक्रिया पार पाडली तर पन्हाळा मंडलाधिकारी श्री.कोतेकर यांनी निवणूक अधिकारी म्हणून काम पाहिले कोडोली पोलीस सानप, मुल्ला हे बंदोबस्ताला होते यावेळी सर्व ग्रा.पं. सदस्य ,ग्रामस्थ व जनसुराज्य शक्ती पक्षाचे सर्व कार्यकर्ते हजर होते.

No comments :

Post a Comment