Powered by Blogger.

Friday, 16 June 2017

मौजे वडगांव येथील विद्या मंदिरमध्ये पहिलीच्या विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प व पुस्तक देऊन स्वागत

No comments :

हेरले / प्रतिनिधी :
  हातकणंगले तालूक्यातील मौजे वडगांव येथील विद्या मंदिर  या प्राथमिक शाळेत इयत्ता पहिलीच्या वर्गातील विद्यार्थाचे नवागतांचे स्वागत कार्यक्रम शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष संतोष मोरे व मुख्याधापक ए .के. पाटील यांच्या उपस्थित संपन्न झाला .
       यावेळी पहिलीच्या विद्यार्थ्यांना गुलाबपुष्प व पुस्तक  देऊन स्वागत केले.
त्याचबरोबर सामाजिक कार्यकर्ते प्रकाश कांबरे यांनी शाळेला ९०० वह्या, पेन, पुस्तके देण्याचे जाहीर केले.
शासनाने या वर्षापासुन पोशाख संदर्भात बँकेत पालक, माता, व पाल्य, यांच एकत्रित बैंक खाते काढून त्याचा खाते नंबर शाळेत द्यावा व पोशाख स्वतः खरेदी करून त्याची पावती शाळेत जमा करावी व चेक घेऊन जावे असे आवाहन केले .
या कार्यक्रमास शिक्षक वृंद शिवाजी पाटील, शिवाजी लोखंडे, प्रशांत पाटील, माणिक पाडळकर, अविष्कार कांबळे, योगेश पाखले, कटकोळे, .श्रद्धा गोखले, नदाफ मॅडम,सह सर्व शालेय समिती सदस्य, महादेव चौगुले, राजकुमार चौगुले, युवा नेते प्रकाश झांबरे , रमेश लोंढे, संदीप कांबरे, गणपती भोरे, उदय तराळ शालेय पोषण ठेकेदार सुनिल गरड , महिला, पालक, माता, ग्रामस्थ मोठ्या संख्येने  उपस्थित होते
    फोटो - मौजे वडगांव येथील शाळेमध्ये नवगतांचे स्वागत करतांना शिक्षण समिती.

No comments :

Post a Comment