Friday, 16 June 2017
ज्ञानप्रबोधिनी स्केटिंग कल्बच्या खेळाडूंचे यश
मुरगुड प्रतिनिधी - समीर कटके
२२ व्या राष्ट्रीय रिले स्केटींग स्पर्धेत ज्ञानप्रबोधिनी स्केटिंग कल्ब गारगोटीच्या खेळाडूंनी अनेक पदकांची कमाई केली. रोलर रिले स्केटिंग फेडरेशन ऑफ इंडिया यांच्या मान्यतेने औरंगाबाद येथील विभागीय क्रीडा संकुल येथे स्पर्धा पार पडल्या. या स्पर्धेत देशभरातून ४०० खेळाडूंनी सहभाग घेऊन स्पर्धेला मोठा प्रतिसाद दिला. स्पर्धा स्केटिंगच्या तीन विविध प्रकारात खेळवण्यात आली.
स्पर्धेतील विजेते ६ वर्षाखालील गट - यश दबडे (एक सुवर्ण व एक रौप्य पदक) ८ वर्षाखालील गट - र्धेर्यशिल पारळे (दोन सुवर्ण, एक रौप्य पदक), हर्षवर्धन थोरबोले (एक सुवर्ण, एक रौप्य पदक), सार्थक पाटील (दोन सुवर्ण पदक),
ओंकार पाटील (दोन सुवर्ण, एक कास्य)
१० वर्षाखालील गट - तेजस पाटील (एक सुवर्ण, एक रौप्य पदक), हर्षवर्धन पाटील (सुवर्ण पदक) १२ वर्षाखालील गट - भूषण जबडे (दोन सुवर्ण पदक), साहील पाटील (तीन रौप्य पदक), हर्षद पाटील (एक सुवर्ण पदक), श्री लोकरे (एक सुवर्ण, एक कास्य पदक) १४ वर्षाखालील गट - गुरुनाथ चव्हाण (रौप्य पदक), संचित पाटील (रौप्य पदक), प्रतिक सारंग (रौप्य पदक), अजय पाटील (कास्य पदक), खुशी थडके (एक सुवर्ण, एक कास्य पदक)
या खेळाडूंना प्रशिक्षक इंद्रजित मराठे यांचे मार्गदर्शन तसेच ज्ञानप्रबोधिनीचे अध्यक्ष प्राचार्य मिलिंद पांगिरेकर मारुती पारळे, तुकाराम पाटील, साताप्पा पाटील, अर्जुन सारंग, शरद थडके यांच्यासह पालकांचे प्रोत्साहन मिळाले.
No comments :
Post a Comment