Friday, 23 June 2017
सौ. विजयादेवी यादव इंग्लिश मिडियम स्कूल मध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा
पेठ वडगांव:-
येथील सौ. विजयादेवी यादव इंग्लिश मिडियम स्कूलच्या प्रांगणात जागतिक योग दिन साजरा करण्यात आला. योगादिनाच्या निमित्ताने आज योगाचे, प्राणायामाचे महत्व दाखून देऊन योगासने, प्राणायाम करण्यात आले.
याप्रसंगी सुर्यनमस्कार, पर्वतासन, वृक्षासन, हस्तपादासन, सर्वांगासन , हालासन, शलभासन, पवनमुक्तासन, मकरासन ही आसने करण्यात आली. तसेच काही प्राणायाम ही करण्यात आहे यामध्ये कपालभारती, अनुलोम विलोम, उज्जयणी, कुंभक नाडीशोध असे प्राणायाम घेण्यात आले. यावेळी शाळेतील सर्व विद्यार्थी,पालक आदींनी उपस्थिती दर्शवली.
त्याच बरोबर जागतिक योगदिनास संस्थेचे अध्यक्ष गुलाबराव पोळ, सचिव विद्या गुलाबराव पोळ (ताई), प्राचार्य डाॅ. सरदार जाधव, विद्यालय प्रशासकीय अधिकारी भीमा गोणी, दैनिक लोकमत प्रतिनिधी सुहास जाधव यांच्यासह 1400 विद्यार्थी, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व परिसरातील नागरीक मोठया संख्येने उपस्थित होते. त्यांनी जागतिक योगदिनाचे महत्व समजून घेतले.
योगासनातून मनःशांती लाभते, आपल्या शारीरिक तंदुरुस्तीसाठी मनाच्या एकाग्रतेतून आपला विकास होऊ शकतो. धावपळीच्या या जगात आज विश्रांती व एकाग्रतेची खूपच गरज आहे. त्यासाठी काही आसने, प्राणायाम यांच्या सहाय्याने आपण आपले आरोग्य चांगले ठेवू शकतो, पर्यायाने आपण आपला समाज निरोगी व संतुलित राहण्यास मदत होते असे प्रतिपादन श्री. गुलाबराव पोळ यांनी व्यक्त केले.
जागतिक योगा दिन यशस्वी करण्यासाठी संस्थेचे अध्यक्ष गुलाबराव पोळ, संस्था सचिव विद्या पोळ, प्राचार्य डाॅ.सरदार जाधव यांची प्रेरणा मिळाली तर उपप्राचार्या सौ. स्नेहल नार्वेकर, विद्यालय प्रशासकीय अधिकारी भीमा गोणी, शितल देसाई, सागर पाटील, महेश काळे मारूती कांबळे यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यास भरपूर परिश्रम घेतले.
No comments :
Post a Comment