Friday, 23 June 2017
देवाळे विद्यालयाचा महेंद्र जयवंत पाटील (देवाळे) ९५% गुण मिळवून प्रथम
बोरपाडळे - :- प्रतिनिधी - कृष्णात हिरवे
देवाळे विद्यालय देवाळे (ता.पन्हाळा) या शाळेचा मार्च २०१७ चा दहावी परीक्षेचा निकाल ९३.०७% लागला. या मध्ये महेंद्र जयवंत पाटील (देवाळे) ९५% गुण मिळवून प्रथम, प्रतिकराज सुनील चव्हाण (बोरपाडळे) ९४.८०% गुण मिळवून दुसरा, तर सायली अशोक पाटील (आवळीं) ८९.८०% गुण मिळवून तिसरा क्रमांकाने उत्तीर्ण होऊन भरघोस यश संपादन केले आहे. शाळेच्या परिसरात या सर्व मुलांचे कौतुक होत आहे.
यशस्वी सर्व विद्यार्थ्यांना संस्थाचालक, मुख्याध्यापक,पर्यवेक्षक , शिक्षकवृंद व पालक यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले आहे.
Subscribe to:
Post Comments
(
Atom
)
No comments :
Post a Comment