Powered by Blogger.

Friday, 30 June 2017

मुरगूड नगरपालिकेचे नागरीकांकडून अभिनंदन.: जुन्या पद्धतीनेच घरफाळा आकारणीचा निर्णय

No comments :

जुन्या पद्धतीने घरफाळा आकारण्याचा पालिकेच्या निर्णयाचे सर्व स्तरातून स्वागत

मुरगूड नगरपालिकेचे नागरीकांकडून अभिनंदन.: घरफाळा आकारणीचा निर्णय

मुरगूड प्रतिनिधी
      मालमत्ता वार्षिक कर आकारणी भांडवली मूल्यावर न करता जुन्या पद्धतीनेच करण्याचा निर्णय मुरगूड नगरपालिकेने घेतल्याबद्दल आज नगराध्यक्ष राजेखान जमादार यांचे व सर्व नगरसेवकांचे मुरगुडकरांच्या वतीने उद्योजक जोतिराम सुर्यवंशी व अन्य नागरीकांनी अभिनंदन केले आहे.
      नोटबंदी नंतर सहकारी बँकांची आर्थिक कोंडी झाली, चलन तुटवड्यामुळे ग्रामीण कृषी अर्थव्यवस्था ढासळली. सध्या सर्वत्र मंदीचे सावट आहे.पावसाची अनियमितता आहे.अनेक शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवले आहे. शेतकरी अडचणीत सापडला आहे.अशा परिस्थितीत नगरपालिकेने नुकत्याच झालेल्या सर्वसाधारण सभेत मालमत्ता वार्षिक कर आकारणी भांडवली मूल्यावर न करता जुन्या पद्धतीनेच करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय सर्वांना दिलासा देणारा आहे.तसेच नगरपालिकेतर्फे शहरात छत्रपती शिवाजी महाराज यांच अश्वारुढ पुतळा उभा करण्याचा ठराव मंजूर करण्यात आला आहे.या दोन्ही निर्णयाचे लेखी पत्र देवून उद्योगपती जोतिराम सुर्यवंशी यांनी स्वागत केले व पालिका प्रशासनाने अभिनंदन केले आहे.आज त्यांनी नगराध्यक्ष राजेखान जमादार यांना भेटून त्यांचे व सर्व नगरसेवकांचे लेखी पत्र देवून अभिनंदन केले.यावेळी त्यांच्या समवेत लक्ष्मी - नारायण नागरी सह.पतसंस्थेचे उपाध्यक्ष चंद्रकांत माळवदे,संचालक विनय पोतदार,संभाजी ब्रिगेडचे संजय घोडके,सोहम भारमल,भाजपचे कागल तालुकाध्यक्ष म्हाळू हजारे, माजी नगराध्यक्ष पांडूरंग भाट,सचिन भारमल,नगरसेवक धनाजी गोधडे,दिपक शिंदे आदी उपस्थीत होते.
                 -------------
फोटो : मुरगूड येथे नगराध्यक्ष राजेखान जमादार यांचे लेखीपत्र देवून अभिनंदन केले त्याप्रसंगी जोतिराम सुर्यवंशी व अन्य मान्यवर.

( छायाचित्र : वेदांतिका फोटो,कुरुकली.)

No comments :

Post a Comment