Monday, 5 June 2017
सिद्धनेर्ली,नदीकिनारा येथे रास्ता रोको करून भाजप सरकारचा निषेध
सिद्धनेर्ली (वार्ताहर)
संपुर्ण महाराष्ट्रात सुरु असणार्या शेतकरी संपामध्ये सिद्धनेर्ली,नदीकिनार येथे रास्ता रोको करून भाजप सरकारचा निषेध करण्यात आला. सकाळी ९.३० वाजता सुरु झालेल्या या संपामध्ये सिद्धनेर्ली, एकोंडी ,बामणी , व्हन्नुर, नदीकिनारा शेंडूर आदी गावातील शेतकऱ्यांनी उत्फूर्त पने सहभाग नोदिविला भाजप सरकारचा निषेध करीत शेतकर्याचे सपूर्ण कर्ज माफ होत नाही तो पर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याच्या निर्णय या वेळी घेण्यात आला . स्वागत व प्रास्ताविक दत्तात्रय पाटील यांनी केले या वेळी लाल बावटा बाधकाम कामगार संघटनेचे जिल्हा अध्यक्ष कॉम्रेड शिवाजी मगदूम म्हणाले कि भाजप सरकार हे शेतकऱ्याच्या आणि दिन दलीताच्या विरोधातील सरकार आहे . शेतकर्याचा संप सुरु असताना त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करून त्यांनी शेतकर्याचा विश्वास घात केला आहे .भांडवल दाराची कोटीची कर्जे माफ करून त्यांनी स्वताचा खिसा भरण्याचे काम करीत आहेत पण शेतकर्याना कर्ज माफ करावयाचे म्हटलं कि यांच्या बैठका सुरु होतात असे मगदूम बोलताना म्हणाले . कॉम्रेड सदाशिव निकम म्हणाले कि शेतकऱ्यांनी भाजपच्या जाहिरातीवर विश्वास ठेऊ नये .जाहिरात बगून फक्त तेल आणि साबण निवडायचा असतो भाजप सारखे फसवे सरकार नाही . या प्रसंगी सिद्धनेर्ली, एकोंडी ,बामणी , व्हन्नुर, नदीकिनारा ,शेंडूर गावातील शेतकरी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.या वेळी आंदोलनाच्या प्रमुख मागण्या स्वाभिमनी आयोगाची आमलबजावणी करा , शेतीला हमी भाव द्या ,शेतकार्याचे सातबारा कर्ज मुक्त करा . खोटे गुन्हे मागे घ्या ,शेतीसाठी बिन व्याजी कर्ज द्या आदी मागण्या करण्यात आल्या . अजित नवाळे यांचा अभिनंदनाचा ठराव- मुख्य मंत्री देवेंद्र फडणवीस सदाभाऊ खोत ,सयाजी सूर्यवंशी यांनी आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केला पण अजित नवाळे यांनी तो मोडून काडला व शेतकऱ्याचा संप सुरु ठेवला त्या बद्दल आंदोलन स्थळी त्यांचा अभिनंदनाचा ठराव करण्यात आला. चौकट – सिद्धनेर्ली मधील भाजप कार्यकर्त्यांनि फिरवली आंदोलनाकडे पाट या वेळी सिद्धनेर्ली,नदीकिनार येथे आंदोलन करावयाचे आहे असे जाहीर केले असताना मात्र या आंदोलन ठिकाणी एकही भाजप कार्यकर्ता किवा प्रमुक व्यक्ती दिसला नाही याची चार्च्या मात्र आंदोलन ठिकाणी जोरदार चालू होती. -पिंपळगाव येथे दुध संकलन बंद ठेऊन सर्व व्यापी बंदला पाठींबा- पिंपळगाव येथील सर्व दुध संस्थांनी आज आपले संकलन बंद ठेऊन सर्व व्यापी बंदला पाठींबा दर्शिविला तर गावातील असणार्या शेतकऱ्यांनी दुध एकत्र करून गरजू लोकाना वाटले तर गावातील असणार्या शेतकर्यांनी आज भागातील आठवडा बाजार असतान शेतातील भाजीपाला गावातील लोकांना वाटून या सध्या सुरु असणार्या सर्व व्यापी बंदला पाठींबा दर्शिविला.त्याच बरोबर सरसकट कर्जमाफी व्हावी त्याच बरोबर शेतीमालाला हमीभाव, दुध दर वाढ मिळावा अस्या मागण्या शेतकर्यांनी मिळाव्यात अश्या भावना व्यक्त केल्या. या वेळी गावातील सर्व शेतकरी,दुध संस्थाचे पदाधिकारी,ग्रामस्थ याची बैठक इंदिरा सहकारी दुध संस्थे मध्ये घेण्यात आली .
No comments :
Post a Comment