Powered by Blogger.

Monday, 5 June 2017

मुरगुड शहरात कडकडीत बंद

No comments :

मुरगुड शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला. बाजारपेठेतील व्यवहार पूर्ण बंद ठेवले. रविवारी याबाबत मुरगुड व्यापारी असोसिअशने बंदचे आवाहन केले होते. प्रारंभी सकाळी 8 वा काही व्यापाऱ्यांनी दुकाने उघडून व्यवहार सुरु केले. त्यानंतर सोशल मीडियावर मुरगुड बंदला तुरळक प्रतिसाद अशा आशयाच्या पोस्ट व खुल्या दुकानांची छायाचित्र झळकल्यानंतर संबंधितांनी व्यवहार बंद केले.
निपाणी मुधाळतिट्टा रोड वरील वाहने दुरुस्तीची काही दुकाने सुरु असल्याचे कळताच दुपारी साडे अकरा वाजता गावभागातील काही शेतकरी तरुणांनी मोटर सायकल फेरी काढून दुकाने बंद करण्यास भाग पाडले. शहर व परिसरातील शाळांना सुट्टी असली तरी दहावी बारावीच्या तासिका सुरु आहेत पण  तेही कामकाज बंद ठेवण्यात आले.त्यामुळे बस स्थानक नवी पेठ भागात शुकशुकाट होता.
    
आज होणारा मूरगुडचा आठवडी बाजार बंद
      
      मुरगुड  व्यापारी   असोसिअशनच्यावतीने शेतकरी  आंदोलनास   पाठिंबा  दर्शवण्यासाठी मुरगुड आठवडी  बाजार   बंद   ठेवण्याबाबतचे निवेदन   नगराध्यक्ष   राजेखान   जमादार यांच्याकडे देण्यात आले. या  वेळी    सदाशिव आंगज, दिगंबर भिलवडीकर,आनंदा गोरुले, बाबासो पटेल, प्रशांत शहा, किशोर पोतदार, किरण गवाणकर, शशी दरेकर, धोंडीराम मकानदार आदी उपस्थित होते.
      स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडूनही आठवडी बाजार स्थगित करून आंदोलनास पाठिंबा द्यावा अशा मागणीचे निवेदन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष डॉ बाळासो पाटील, उपाध्यक्ष  नामदेव भराडे, युवा संघटनेचे अध्यक्ष शिवाजी कळमकर, संदीप रामाने यांनी नगराध्यक्षांना दिलेे.

साप्ताहिक शांती टाईम्स शी बोलताना मुरगुडचे नगराध्यक्ष राजेखान जमादार म्हणाले,
" राज्यातील शेतकरी आंदोलनात शिवसेना सक्रिय असल्यामुळे आजच्या राज्यबंद आंदोलनास पाठिंबा दिला आहे. त्याबरोबरच मुरगुड शहरात दर मंगळवारी भरणारा आठवडी बाजार बंद ठेवून शेतकऱ्यांच्या मागण्या शासनाने ताबडतोब मान्य कराव्यात यासाठी आंदोलनास पाठिंबा देण्याचा निर्णय मुरगुड व्यापारी असोसिएशनच्या सहकार्याने व पाठिंब्याने घेतला आहे."यावेळी उपनगराध्यक्ष जयसिंग भोसले उपस्थित होते.

फोटो :         शेतकरी आंदोलनास पाठींबा देण्यासाठी मंगळवार दि 6 मे रोजी भरणारा मूरगुडचा आठवडी बाजार स्थगित करावा  मागणीचे निवेदन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे डॉ बाळासो पाटील, नामदेव भराडे, शिवाजी कळमकर त्यांच्या समवेत व्यापारी असोसिएशनचे पदाधिकारी

No comments :

Post a Comment