Powered by Blogger.

Monday, 5 June 2017

कुरुकलीत शेतकऱ्यांचा शासनाविरुद्ध एल्गार निपाणी फोंडा राज्य मार्गावर रास्तारोको : शेकडो वाहने रोखली.

No comments :

मुरगूड प्रतिनिधी : दि 5              
       कुरुकली ता कागल या मुरगुड निपाणी रोडवर   असणाऱ्या   छोट्याश्या   गावाने शेतकऱ्यांनी पुकारलेल्या आजच्या महाराष्ट्र बंदला  जाहीर पाठींबा दिला . मुरगूड -  निपाणी राज्य मार्गावर बैलजोडी,बैलगाडी बांधून शेकडो शेतकऱ्यांनी रास्तारोको आंदोलन केले.निपाणी फोंडा राज्य मार्गावर तब्बल दीड किलोमीटर शेकडो वाहनांच्या रांगा  वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.  शेतकरी संघटनांनी पुकारलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मुरगुड व परिसरातील 50 गावांमध्ये बंद पाळण्यात आला. पण एवढ्या मोठ्या संख्येने शेतकऱ्यांनी  उत्स्फूर्तपणे  रस्त्यावर येऊन  केलेले रस्ता रोको आंदोलन लक्षवेधी ठरले.
        महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करून सरसकट कर्जमाफी मिळालीच पाहीजे , स्वामिनाथन आयोगाच्या शिफारसी लागू कराव्यात व शेतकऱ्यांना उत्पादन खर्चाच्या 50 टक्के हमीभाव मिळावा यासह अन्य मागण्यासाठी महाराष्ट्र बंद ची हाक देण्यात आली.या बंदला पाठींबा देण्यासाठी कुरुकली (ता.कागल ) येथे सर्व पक्षीय आंदोलन करण्यात आले.गावातील सर्व शेतकऱ्यांनी एकत्रीत येवून रास्ता रोकोचे हत्यार उपसले.रस्त्यावर बैलजोडी,बैलगाडी बांधून शेतकऱ्यांनी रस्त्यावरच ठिय्या मांडला.सकाळी आठ वाजल्यापासून या आंदोलनास सुरुवात झाली. कोणतीही पूर्वसूचना किंवा गावपातळीवर कोणतीही बैठक झाली नसताना  लोक स्वयंस्फूर्तीने आंदोलनात सहभागी झाले. प्रारंभी आंदोलन मर्यादित स्वरूपात  असावे असे वाटत होते पण 9 वाजे पर्यंत गावातील महिला आबालवृद्ध शेकडोच्या संख्येने जमले.दरम्यान 9.30 वाजता मुरगूड पोलीस ठाण्याचे स.पो.नि.ए.एस.तांबे यांच्यासह अन्य पोलीस कर्मचाऱ्यांनी आंदोलन स्थळी येवून आंदोलकांना रास्तारोको करु नये.आंदोलन थांबवावे अशी विनंती केली.मात्र आंदोलकांनी ही विनंती धुडकावून लावत आंदोलन सुरुच ठेवले.यावेळी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. कोणताही अनुचित प्रकार होऊ नये याची दक्षता पोलीस प्रशासनाने घेतली.
      अंदोलकांनामध्ये स्त्रियांनीही सहभाग घेतला. यावेळी शासनाच्या निषेधाच्या  व कर्जमाफी मिळालीच पाहिजे अशा घोषणा देण्यात आल्या. तब्बल साडेतीन तास मार्ग रोखल्यामुळे मुधाळ तिट्टा व निपाणी या दोन्ही बाजूने येणारी वाहने रोखल्यामुळे सुरूपली ते सोनगे दरम्यान शेकडो वाहने थांबल्याने वाहतूक ठप्प झाली. एस टी वाहतूक पूर्ण बंद झाली. शेतकऱ्यांमध्ये शासन व मुख्यमंत्री यांच्याबद्दल प्रचंड संताप व रोष होता. अशाही परिस्थितीत कुरुकली ग्रामस्थांनी सामाजिक भान दाखवून  अत्यावश्यक सेवा , अँबुलन्स, लग्नाची वऱ्हाडे सोडली. पोलीसांनी 20 जणांना खबरदारीचा  उपाय  म्हणून  ताब्यात घेतले व  नंतर सोडून दिले.

फोटो :   कुरुकलीच्या शेतकऱ्यांनी बैलांसह ठिय्या मारून   निपाणी फोंडा राजमार्ग बंद पडला

फोटो :   पोलिसांनी आंदोलन कर्त्यांशी चर्चा करून त्यांना  रस्ता बंद करण्यास परावृत्त करण्याचा प्रयत्न केला पण पोलिसांना न जुमानता आंदोलन सुरूच राहिले.

फोटो:     रस्ता रोको मूळे थांबलेली वाहतूक

No comments :

Post a Comment